Dozens of cars vandalized in Shramik Nagar in early morning frenzy of Tawal Khor. esakal
नाशिक

Nashik News : श्रमिकनगरमध्ये डझनभर वाहनांची तोडफोड; नागरिकांमध्ये दहशत

Nashik : डझनभर वाहने फोडण्याचा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांच्या नाकावर टिच्चून टवाळखोरांनी उन्माद करत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : श्रमिकनगर येथील सात माऊली चौक, शनी चौक परिसरात पहाटे चार वाजेच्या सुमारास डझनभर वाहने फोडण्याचा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांच्या नाकावर टिच्चून टवाळखोरांनी उन्माद करत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या टवाळखोरांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी भयभीत महिला व नागरिकांनी केली आहे. ()

गेल्या काही महिन्यांपासून सातपूर परिसरातील टवाळखोरांचा उन्माद वाढला असून सातपूर पोलिस ठाण्यात नवीन बदलून आलेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित नलवडे यांचे स्वागतच जणू या टवाळखोरांनी पहाटेच्या वेळी आपला उन्माद दाखवत केल्याचे बोलले जात आहे.

महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ मध्ये श्रमिकनगरमधील रहिवासी हेमंत शिरसाठ, संजय देशमुख, दीपक महाले आदींसह सुमारे डझनभर नागरिकांच्या वाहनांची पहाटे काही समाजकंटकांकडून तोडफोड झाली.

घटनास्थळी भाजयुमो शहर सरचिटणीस अमोल दिनकर पाटील, सातपूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित नलावडे, उपनिरीक्षक राठोड समवेत संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यानंतर नलवडे यांनी ताबडतोब कारवाईचे आदेश दिले.

तोडफोडीसह गोळीबारचा इतिहास

या पूर्वीही याच परिसरात वाहन तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. तसेच नंदन जयस्वाल या परप्रांतीय युवकाने याच सातमाऊली चौकात गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. आता पुन्हा राजकीय वरदहस्त लाभलेल्या टवाळखोरांनी पोलिसांच्या नाकावर टिच्चून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

''पहाटे चारच्या दरम्यान काही तरूणांनी वाहनांची तोडफोड केली. गल्लीत दिसेल त्या वाहनाला लक्ष्य करत एकप्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिस प्रशासनाने संबंधितांवर कडक कारवाई करावी.''- हेमंत शिरसाठ, स्थानिक नागरिक

''कामगार लोकवस्तीमधील सातमाऊली चौकात पहाटे काही समाजकंटकांनी वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे समजताच घटनास्थळी धाव घेत पोलिस प्रशासनालाही बोलविले. नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. नेहमीच या परिसरात गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. नलवडे साहेबांनी विशेष लक्ष देवून संबंधितावर कडक कारवाई करावी.''- अमोल पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: डोनाल्ड ट्रम्प जिंकले तर शेअर बाजार कोसळणार; कमला हॅरिस अध्यक्ष झाल्यास काय होईल?

भाजपची 'ती' ऑफर स्वीकारली असती, तर जयंतराव आणि मी लालदिव्यातून फिरलो असतो; सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट

हे काय वागणं आहे... Bigg Boss 18 मधील 'या' स्पर्धकावर भडकली रुपाली भोसले; सिद्धार्थ शुक्लासोबत तुलना करत म्हणाली-

Fact Check :'गंभीरकडून काही होणार नाही, मला कमबॅक करावं लागेल'; MS Dhoniचा Video Viral, चाहते सैराट

Latest Marathi News Updates live : अजित पवार गटातील कार्याध्यक्ष, जनरल सेक्रेटरींची शरद पवारांच्या पक्षात घरवापसी

SCROLL FOR NEXT