येवला : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेली, शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या राजापूर येथील राजा-मन्नाशाची यात्रा उद्या (ता.२६) पासून सुरू होत आहे. तीन दिवस ही यात्रा भरते, ग्रामदैवताची यात्रा असल्याने संपूर्ण गाव या यात्रेत सहभागी होते. दरम्यान आज शनिवारी (त.२५) सायंकाळी संदल मिरवणूक काढण्यात आली.
सुमारे सोळाव्या शतकात राजापूर हे गाव अरबी सामंत काळातील अहमदनगर जिल्ह्यातील भाग होता. त्यावेळी राजा-मन्नाशा स्थानिक प्रशासक होता. राजाने त्या काळात बांधलेली मशीद आजही येथे उभी असून राजाच्या निधनानंतर राणीने अनेक वर्ष येथील कारभार पाहिला. राजाची आठवण म्हणून राजा-मन्नाशाची हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र येवून यात्रा भरवतात.
राजाने बांधलेली मशिदीच्या बाजूस एक सुंदर बाग होती. या बागेत राणीने राजाची कबर तयार केली असून तेथे आज हिंदू-मुस्लीम हा भेदभाव विसरुन गावकरी एकत्र येतात. याच यात्रेला लोक राजूमन बाबाची यात्रा म्हणतात. यात्रेला वैजापूर, औरंगाबाद, मालेगाव येथील मुस्लीम बांधव दर्शनासाठी येतात.
यात्रेच्या चार दिवस अगोदर लोकवर्गणीतून कबरीस रंगकाम करण्यात आले. शुक्रवारी रात्री मुस्लिम बांधवानी सनईवाद्याच्या गजरात संदल चढवत पूजा केली. उद्या गावकरी नारळ, मलिदा व अगरबत्ती धूप देवून नवस फेडतील. नवस फेडण्यासाठी सर्वधर्मीय सायंकाळी येतात. उद्या रात्रीच्या वेळी शोभेच्या दारुचा आतिषबाजीचा कार्यक्रम व त्यानंतर लोकनाट्य होईल.
यात्रेनिमित्त आरोग्य शिबिर
राजापूर येथे यात्रेनिमित्त रविवारी मोफत महाआरोग्य शिबिर होणार आहे. नाशिक येथील विविध तज्ज्ञ डॉक्टर तपासणीसाठी उपस्थित राहतील. येथील माध्यमिक विद्यालयात सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यत हे शिबिर होईल. सर्व रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन नाशिक येथील निरामय हॉस्पिटलतर्फे डॉ. मारोती घुगे व सर्व संचालकानी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.