godavari river esakal
नाशिक

Godavari River : जन्मदिनीही गोदावरीची अवहेलना

सकाळ वृत्तसेवा

Godavari River : नाशिकपासून आंध्र प्रदेशापर्यंत कोट्यवधी भारतीयांची जीवनदायिनी असलेल्या गोदावरीची ( Godavari ) जन्मदिनीही अवहेलना सुरूच आहे. प्रवाही नसल्याने सर्वच कुंडांना गटारीचे स्वरूप आले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नदीपात्रात कपडे धुण्याबरोबरच गटारीही बिनदिक्कत मिसळत असल्याने तिला अक्षरशः गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. (Godavari River)

त्रेतायुगात जन्म घेतलेल्या गोदावरी कलियुगातही कोट्यवधी जिवांची जीवनदायिनी आहे. मात्र सध्या गोदावरी प्रवाहित नसल्याने तिला गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. धार्मिकदृष्ट्या महत्त्व असल्याने रामतीर्थाची नियमित साफसफाई होते, परंतु त्याखालील कुंडाकडे दुर्लक्ष होत असल्याने यात मोठ्या प्रमाणावर गाळ व अन्य कचरा साचला आहे.

त्यातच नदीपात्रात वाघाडीसह अन्य नाले मिसळत असल्याने पाण्यावर तवंग आला आहे. मात्र याचे कोणतेही सोयरसुतक ना गोदाआरती करणारांना ना प्रशासनाला अशी स्थिती आहे. काही वर्षांपूर्वी देवांग जानी यांनी उच्च न्यायालयात गोदावरीच्या दुरवस्थेबाबत याचिका दाखल केल्यावर गोदावरीच्या दुतर्फा सिक्युरिटीची नियुक्ती करण्यात आली होती.

मात्र हे सुरक्षारक्षक गायब झाल्यावर पुन्हा गोदावरीत कपडे धुणे बिनदिक्कत सुरूच आहे. याशिवाय बाहेरून आलेले भाविक नदीकिनारी स्वयंपाक, भोजन करून उरलेले अन्नही येथेच टाकून जातात. याशिवाय भांडीही नदीच्या पाण्यात धुतात. यामुळे अहिल्यादेवी होळकर पुलापासून ते तपोवनापर्यंत गोदापात्र काळवंडलेले दिसते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT