Center Director, Deputy Center Director attended the consultation meeting held at Santosh Shramik Secondary and Higher Secondary School. esakal
नाशिक

HSC Exam 2024 : बाभूळगाव केंद्राची बारावीची आसन व्यवस्था; भाटगावसह येवल्यातील विद्यार्थी देणार परीक्षा

HSC Exam 2024 : इयत्ता बारावी परीक्षेची बाभूळगाव (केंद्र क्रमाक ०२११) केंद्रावरील आसन व्यवस्था जाहीर झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

HSC Exam 2024 : इयत्ता बारावी परीक्षेची बाभूळगाव (केंद्र क्रमाक ०२११) केंद्रावरील आसन व्यवस्था जाहीर झाली आहे. बाभूळगाव येथील संतोष श्रमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बाभुळगावसह एरंडगाव, भाटगाव, जळगाव नेऊर व येवल्यातील सुमारे १,३५० विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था केली आहे, अशी माहिती केंद्र संचालक जी. एस. येवले यांनी दिली. (nashik HSC Exam 2024 marathi news )

बाभूळगाव केंद्रावर विज्ञान शाखेचे एस०-१९४९८ ते २०६१६, कला शाखेचे एस०-९९४७६ ते ९९६६८ आणि वाणिज्य शाखेतील एस-१५३२४१ ते १५३२८१ व १६८३६५ या आसन क्रमांकाची सर्व विषयांची आसन व्यव्यस्था असणार आहे.

इंग्रजी, फिजिक्स, केमिस्ट्री, गणित विषयाची आसनव् यवस्था संतोष कनिष्ठ महाविद्यालं, एसएनडी बीएड कॉलेज व एसएनडी पॉलिटेक्निक इमारतीत, तर मराठी, बायोलॉजीसाठी संतोष श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय व एसएनडी बीएड कॉलेजची इमारत असणार आहे. इतर सर्व विषयांची परीक्षा संतोष श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात होणार आहे.

परीक्षार्थींनी सकाळ सत्राच्या परीक्षेसाठी सकाळी साडेदहा, तर दुपारच्या परीक्षेसाठी अडीचला हजर रहावे. बदलत्या नियमानुसार एक मिनिट उशीर झाला, तरी प्रवेश दिला जाणार नाही. बदललेली आसन व्यवस्था दररोज विद्यालयातील फलकावर लिहिलेली असणार आहे. परीक्षा परिसरात भ्रमणध्वनी, पेजर, कॉपीस उपयुक्त मजकूर आणू नये.

कॉपीविरहित परीक्षा घेतली जाणार आहे. कडक पोलिस बंदोबस्तात असणार आहे. अनधिकृत व्यक्तींना परीक्षा केंद्रापासून दोनशे मीटर परिसरात कायद्यानुसार बंदी असणार आहे. दक्षता समिती केंद्रावर कार्यरत राहणार आहे.

उपकेंद्रसंचालक म्हणून विठ्ठलसिंग परदेशी, आप्पासाहेब कदम, किरण पैठणकर, रामदास चव्हाण, चंद्रशेखर जोशी, लक्ष्मण बारहाते यांची नियुक्ती झाली आहे, अशी माहिती केंद्रसंचालक येवले यांनी दिली. ( latest marathi news )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT