Nashik News : महसूल ( Revenue ) वसुलीत पिच्छाडीवर असलेल्या सात तहसीलदारांना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी नोटीस बजावली आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंतच वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी शुक्रवारी (ता.१६) जिल्ह्यातील प्रांत व तहसीलदारांची आढावा बैठक घेतली. (Nashik News Notice to Tehsildars in district)
शासनाने चालू वर्षी जिल्हा प्रशासनाला २१९ कोटी २५ लाखाचे महसूल वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. त्यामध्ये गौणखनिज विभागाच्या १०९.३१ कोटी तसेच जमीन महसुलच्या १०९.९४ कोटी रुपयांचा समावेश आहे. पंधरा तालुक्यांनी आतापर्यंत एकूण १९१ कोटी ६४ लाख ४८ हजारांची वसुली पूर्ण केली असून त्याचे प्रमाण ८७.४१ टक्के इतके आहे. यंत्रणांनी जमीन महसूलची ८४. कोटी ३३ लाख ८८ हजार रुपये (७७.१६ टक्के) वसुल केले आहेत.
गौणखनिजची ९८ टक्के म्हणजेच १०७ कोटी ३० लाख ६० हजार रुपयांची वसुली प्रशासनाने गाठली आहे. महसूल वसुलीमध्ये सिन्नर, पेठ, सुरगाणा, चांदवड व बागलाण या तालुक्यांची वसुली ५० टक्यांच्या आत असल्याचे बैठकीत समोर आले. इगतपुरीची ६७ व देवळ्याची वसुली ६५ टक्केच आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी शर्मा यांनी संबंधित तालुक्यांच्या तहसीलदारांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले.
तलाठ्यांनी वसुलीवर लक्ष द्यावे
जिल्हाधिकारी शर्मा यांनी जिल्ह्यातील सर्व तलाठ्यांनी त्यांच्या नियमित वसुलीवर लक्ष द्यावे, असे निर्देश दिलेत. शेतसारा, जमीन महसूल व अन्य वसुलीमध्ये कोणताही खंड पडू नये, याकडे तलाठ्यांनी लक्ष द्यावे. त्याबाबत तहसीलदारांनी नियमित आढावा घ्यावा, अशा सूचनाही दिल्याचे जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.