Police Inspector Ashok Najan esakal
नाशिक

Nashik News: पोलीस ठाण्यातच निरीक्षकाने डोक्यात झाडून घेतली गोळी; घटनेने शहर हादरले

Nashik Latest News : या घटनेने नाशिक पोलिस दलासह शहर हादरले असून आप्तांसह मित्र परिवारांमध्ये हळहळ व्यक्त होते आहे.

सकाळ वृतसेवा

नाशिक/सिडको : येथील अंबड पोलिस ठाण्यातील गुन्हेशोध शाखेचे पोलीस निरीक्षकांनी मंगळवारी (ता. २०) सकाळी साडेनऊ-पावणे दहाच्या सुमारास केबिनमध्ये स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉलव्हरमधून डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्त्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

या घटनेने नाशिक पोलिस दलासह शहर हादरले असून आप्तांसह मित्र परिवारांमध्ये हळहळ व्यक्त होते आहे. दरम्यान, कौठुंबिक कलहातून आत्महत्त्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. (Nashik Police Inspector Ambad Police Station shot himself marathi news)

अशोक निवृत्ती नजन (४७, रा. इंदिरानगर, नाशिक. मूळ रा. वैजापूर, जि. औरंगाबाद) असे मयत पोलीस निरीक्षकांचे नाव आहे. मंगळवारी (ता. २०) रात्री उशिरा त्यांच्यावर मूळगावी वैजापूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, वर्षभरापूर्वी अंबड पोलीस ठाण्यात रुजू झालेले पोलीस निरीक्षक अशोक नजन यांनी सोमवारी (ता. १९) शिवजयंतीनिमित्ताने मंगळवारी (ता.२०) पहाटेपर्यंत सिडको परिसरात बंदोबस्त केला. पहाटेच्या सुमारास ते घरी गेले. त्यानंतर ते सकाळी सव्वा नऊ-साडेनऊच्या सुमारास अंबड पोलीस ठाण्यात आले.

त्यावेळी त्यांनी पोलीस ठाण्यातील अंमलदारांना फॉलिंगचा आदेश दिला. त्यानुसार ठाण्यातील सारे अंमलदार हे आवारात फॉलिंगसाठी उभे राहिले. त्यानंतर नजन हे पुन्हा आतमध्ये त्यांच्या कॅबिनकडे गेले. काही मिनिटांनी काही पडल्याचा आवाज आला.

त्यानंतर अंमलदार शरद झोले हे आतमध्ये पाहण्यासाठी गेले, त्यावेळी नजन यांनी स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून डोक्याच्या उजव्या बाजुला कानाजवळ गोळी मारून घेतली होती व ते त्यांच्या खुर्चीवर निपचित होते. खुर्चीजवळ रक्ताचे थारोळे साचले होते. या घटनेने साऱ्या पोलीस अंमलदारांना धक्का बसला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्यासह आयुक्तालयातील पोलीस अधिकाऱ्यांनी अंबड पोलिस ठाण्यात धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून नजन यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. याप्रकरणी अंबड पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

९७ व्या तुकडीचे उपनिरीक्षक

अशोक नजन हे सत्र-९७ व्या तुकडीचे प्रशिक्षणार्थी होते. २००५ मध्ये ते उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाले. २०१९ मध्ये ते पोलीस निरीक्षक झाले होते. जून २०२३ मध्ये त्यांची नाशिक पोलीस आयुक्तालयात बदली झाली. त्यानंतर त्यांची अंबड पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली होती.

तेव्हापासून गुन्हे शोध पथकाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. अतिशय दमदार कामगिरी आणि हसतमुख व्यक्तीमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. मूळचे वैजापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील रहिवाशी असलेले नजन यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा आहे. मुलगा अकरावीच्या वर्गात शिकतो.

गोळी डोक्यातून आरपार

पोलीस निरीक्षक नजन यांनी कानशिलावर रिव्हॉल्व्हर ठेवून टिगर दाबला. त्यामुळे गोळी डाव्या बाजुने निघून भिंतीलगतच्या कपाटाला लागून पुन्हा विरुद्ध बाजुच्या भिंतीला आदळून जमिनीवर पडलेली आढळून आल्याचे पंचनाम्यात नमूद आहे.

त्यांच्याजवळ सुसाईड नोट आढळून आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या आत्महत्त्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र कौटुंबिक कारणातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे अशी शक्यता व्यक्त होते आहे. (Latest Marathi News)

मित्रांकडून हळहळ

पोलीस निरीक्षक नजन यांच्याच बॅचचे बहुतांशी अधिकारी नाशिक शहर व जिल्ह्यात आहेत. घटनेची माहिती मिळताच वाडिवऱ्हे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारिका आहिरराव, त्र्यंबक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे, पोलीस अकादमीतील पोलीस निरीक्षक दुर्गेश शेलार, आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण, अभियोग कक्षाचे पोलीस निरीक्षक रवी पाचोरकर यांच्यासह इंदिरानगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे, सरकारवाड्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली.

नजन हे अत्यंत दिलखुलास व्यक्तीमत्त्व होते, असे सांगतानाच, गेल्या काही वर्षात मात्र ते मित्रांपासून अलिप्त झाले होते. कधी मोकळेपणाने गप्पा मारणारा मित्र काही वर्षात गप्प झाला होता. मनातले काही सांगितले नाही. परंतु ते असे काही पाऊल उचलतील अशी शक्यता नव्हती, अशा शब्दांत मित्रांनी भावना व्यक्त केल्या.

"घटना अत्यंत दुर्दैवी आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करून घटनेचा तपास केला जाईल. त्यांच्याजवळ कोणतीही सुसाईड नोट आढळून आलेली नाही."

- शेखर देशमुख, सहायक पोलिस आयुक्त.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

बॉक्सर इमाने खलीफ पुरूष असल्याचा वैद्यकिय रिपोर्ट समोर येताच Harbhajan Singh ची 'गोल्ड मेडल' परत करण्याची मागणी

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT