Nashik News : आर्थिक अडचणीत सापडलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक मोठ्या थकबाकीदारांविरोधात ‘अॅक्शन मोड’वर आली आहे. यातून कोट्यवधींच्या कर्ज थकीत प्रकरणी जिल्हा बँकेकडे तारण असलेल्या मालेगावातील द्याने येथील रेणुकादेवी औद्योगिक सहकारी संस्थेच्या मालमत्तेचा लिलाव केला जाणार असून, त्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. (Nashik News Renuka Sanstha property auction )
तसेच भुजबळ कुटुंबीयांच्या मालकीच्या दाभाडी येथील आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड विरोधात बॅंकेने कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. जिल्हा बॅंकेने थकबाकी वसुलीसाठी धडक मोहीम सुरू केली आहे. यात मोठ्या थकबाकीदारांविरोधात कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे.
रेणुकादेवी संस्थेकडे सुमारे ३१ कोटी ७५ लाखांची वसुली थकीत रक्कम वसूल होत असल्याने सरफेसी कायद्याप्रमाणे जिल्हा बँकेने संबंधित संस्थेच्या मालमत्तेची लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. संस्थेवर ७.५० कोटींचे कर्ज होते. मात्र, नियमित कर्जफेड न केल्याने त्यात वाढ होऊन आता रक्कम ३२ कोटी ५० लाखांची मुद्दल असून, ३१ कोटी ७५ लाखांची वसुली केली जाणार आहे.
त्यानुसार रेणुकादेवी संस्थेच्या मालमत्तेची विक्री करण्यासाठी लिलाव होणार असून, यासाठी मक्तेदारांना आवाहन करण्यात आले आहे. मक्तेदारांना १४ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत निविदा अर्ज मिळणार आहेत, तर याच कालावधीत मालमत्ताही पाहता येणार आहे. निविदा दाखल करण्याची अंतिम मुदत ५ मार्च आहे.
या संस्थेचा मालमत्तेचा लिलाव काढलेला असताना दुसरीकडे दाभाडी येथील आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड विरोधात बॅंकेने कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. गेल्या महिन्यात या प्रकरणी भुजबळ कुटुंबीयांना नोटीस पाठवली होती. या साखर कारखान्याकडील ५१ कोटी ६६ लाखांची थकबाकी आहे. बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी कारखाना स्थळावर जाऊन मागणी नोटीस चिकटवलेली होती. त्यानंतर बॅंकेने कायदेशीर कारवाईबाबत असलेली प्रक्रिया सुरू केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.