In the annual meeting of the HAL labor union, the supporters of the union went on a rampage on the issue of Girish Valve. esakal
नाशिक

Nashik News : HAL कामगार संघटनेच्या वार्षिक सभेत गदारोळ; विरोधकांची प्रतिसभा

एचएएल कामगार संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रचंड गदारोळ झाला. सभेच्या अध्यक्षस्थानी अनिल मंडलिक होते.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : येथील एचएएल कामगार संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रचंड गदारोळ झाला. सभेच्या अध्यक्षस्थानी अनिल मंडलिक होते. सभा शांतपणे सुरू असताना सुरवातीच्या तीन विषयांना मंजूर दिली. बदली होऊन आलेल्या कामगार बांधवांनी संघटनेचे सरचिटणीस संजय कुटे व सर्व संघटनेचे आभार मानले. ( Uproar in annual meeting of HAL labor union)

त्यानंतर ऐनवेळी येणाऱ्या विषयावर माजी पदाधिकारी गिरीश वलवे हे उभे राहिले असता काही पदाधिकाऱ्यांनी त्यांना मज्जाव करण्याचा प्रयत्न केला. यामुळे मोठा गदारोळ झाला. ठरलेल्या क्रमानुसार पुढील प्रश्न मांडण्यासाठी कामगार गिरीश वलवे यांना बोलण्याची संधी दिली असता ते मुद्दे मांडताना काही कामगारांनी त्यांना बोलण्यास विरोध केला.

यावेळी शाब्दिक चकमक होऊन सभेत उपस्थित पोलिस कर्मचारी यांनी हा विषय शांत करण्याचा प्रयत्नही केला. परंतु उपस्थित एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने येथील कामगारांना अर्वाच्य, शिवराळ भाषा वापरत लाथा मारल्यामुळे सभेत तणाव निर्माण झाला.

संघटनेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका पोलिसाकडून झालेल्या या गैरवर्तणूकप्रकरणी पोलिस अधीक्षक यांनी तातडीने दखल घ्यावी, असे निवेदन ओझरचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांना देण्यात आले आहे. कामगारांकडून मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त होत असून संबंधित महिला पोलिस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी या निवेदनात संघटनेने केली.

विरोधकांचा सभात्याग व प्रती सभा

माजी सरचिटणीस सचिन ढोमसे व गिरीश वलवे यांनी आपल्या समर्थकांसह सभात्याग करत प्रतिसभा घेतली. यावेळी झालेल्या प्रकाराबद्दल दोन्ही गटांकडून निषेध व्यक्त करण्यात आला. उर्वरित कामगारांचा घरवापसी मुद्दा ढोमसे यांनी मांडत सत्ताधारी पक्षाला विविध मुद्द्यांचा जाब विचारला.

यावेळी वलवे यांच्या गाडीची काच फोडल्याचे त्यांनी सांगितले. विरोधकांनी सभात्याग केल्याने पुढील विषयांवर सभा पुन्हा सुरू केली. त्यानंतर कामगारांनी प्रश्न मांडले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अनिल मंडलिक, सरचिटणीस संजय कुटे यांनी उत्तरे दिली. शेवटी राष्ट्रगीताने दोन्ही सभांचा समारोप झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur North Assembly Election 2024 Results : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज ठाकरेंना मोठा धक्का, अमित ठाकरे पडले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मोहोळमध्ये राजू खरे 29528 मतांनी आघाडीवर

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

SCROLL FOR NEXT