Nashik News : अमर रहे अमर रहे वीर जवान अमर रहे, भारत माता की जय, जय जवान जय किसान अशा घोषणा देत किकवारी खुर्द येथील वीरमरण आलेले जवान राकेश काकुळते यांच्यावर रविवारी (ता.१८) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आदर्श गाव किकवारी खुर्दनगरीने साश्रुनयनांनी आपल्या लाडक्या भूमिपुत्राला अखेरचा निरोप दिला. ( Nashik Veer Jawan Rakesh Kakulte marathi news )
यावेळी पचंक्रोशीसह तालुक्यातील नागरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बागलाण तालुक्यातील किकवारी खुर्द येथील शेतकरी पुत्र राकेश काकुळते गेल्या १९ वर्षापासून पासुन भारतीय लष्कराच्या सेवेत दाखल होते. सुरत येथे आर्मी मुख्यालयात कर्तव्यावर असताना त्यांना शनिवारी (ता.१७) दुपारी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.
उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. वीरजवान राकेश यांचे पार्थिव देह रविवारी सकाळी गावात दाखल झाल्या नंतर राकेशच्या राहत्या घरी मळयात नेण्यात आला. यांनतर फ़ुलानी सजविलेला रथ किकवारी ग्रामस्थांकडून तयार करण्यात आला होता.
या रथातून राकेशची अंतिम मिरवणूक किकवारी नगरीतून काढण्यात आली. यावेळी आमदार दिलीप बोरसे, उपविभागीय प्रांताधिकारी बबनराव काकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी, तहसीलदार कैलास चावडे, पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी पुष्पचक्र अर्पण केले.
तर लष्कराच्यावतीने देवळाली आर्टलरी सेंटरचे मेजर नकुल गोस्वामी यांनी पुष्पचक्र अर्पण केले. सुभेदार राम कीर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली देवळाली कॅम्प येथून आलेल्या जवानांनी शहीद काकुळते यांना मानवंदना देत श्रद्धांजली अर्पण केली. तर महाराष्ट्र पोलिस दलाच्या वतीने नाशिक येथील ग्रामीण पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक नारायण कोरडे व पोलीस हवालदार योगेश नाईक यांच्या पथकाने मानवंदना देण्यात आली. ( latest marathi news )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.