Crop Insurance  esakal
नाशिक

Crop Insurance : निफाड तालुक्यात 33 हजार शेतकऱ्यांनी काढला पीकविमा; भुईमुग, कांद्याचा समावेश

Crop Insurance : प्रधानमंत्री पीकविमा योजनेस निफाड तालुक्यात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

एस. डी. आहिरे

Crop Insurance : प्रधानमंत्री पीकविमा योजनेस निफाड तालुक्यात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. तालुक्यात जुलैअखेर ३३ हजार ९४ शेतकऱ्यांनी सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्रावर पिकविमा उतरवून पिकांना संरक्षण दिले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांचा पीकविमा काढण्याचा कल वाढला आहे. मागीलवर्षी पात्र शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम बँक खात्यावर वळती करण्यात आली आहे. नुकसानीची रक्कम मिळत असल्याने यंदा शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत मोठ्या प्रमाणात पीकविमा काढला. (33 thousand farmers have taken out crop insurance)

निफाड तालुक्यात ३३ हजार ९४ शेतकऱ्यांनी जुलैअखेर ऑनलाईन अर्ज भरले आहेत. शेतकऱ्यांना पीकविम्याचे महत्व पटल्याने शेतकरी पीकविमा काढण्याकडे वळले आहेत. मका, सोयाबीन, भुईमुग, कांदा या पिकांचा यात समावेश आहे. सध्या हवामानाचा लहरिपणा पाहता शेतकरी स्वत:हुन पीकविमा काढण्यासाठी पुढे आले आहेत.

योजनेबाबत प्रत्येक गावामध्ये कृषी सहाय्यकांनी शिबिरे घेऊन प्रचार, प्रसिद्धी करून योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. त्याची फलप्राप्ती शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीकविमा उतरविलेला दिसतो. निफाड तालुक्यात यंदा ३२ हजार हेक्टरवर खरिप पिकांचे क्षेत्र आहे. त्यातील १५ हजार हेक्टर क्षेत्राला पीकविम्याचे कवच मिळाले आहे.

पिकनिहाय शेतकऱ्यांची संख्या

उडीद : ७५

भुईमूग : १०६

मुग : १०४

मका : ४ हजार ५४३

कांदा : ३६१

बाजरी : ५३

ज्वारी : ६३

सोयाबीन : २७ हजार ७८९

एकूण : ३३ हजार ९४

''जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी एक रूपयांत पीकविमा योजनेच लाभ घ्यावा म्हणून कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये सातत्याने जागृती केली जात होती. कृषी सहाय्यकांनी अनेक शेतकऱ्यांच्या गाठीभेटी, शिबिरे घेण्यात आली. त्यातून तब्बल ३३ हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ऑनलाईन पीकविमा भरला आहे. गेल्या वर्षीपेक्षा शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे.''- सुधाकर पवार, तालुका कृषी अधिकारी, निफाड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT