Nashik NMC News : महापालिकेच्या स्थायी व अस्थायी अशा जवळपास पाच हजार कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीचे वीस हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे. मानधनावरील कर्मचाऱ्यांसाठीदेखील दहा हजार रुपये अनुदान देण्याचे पत्रक महापालिकेने काढले आहे. सानुग्रह अनुदानामुळे महापालिकेला नऊ कोटी ५५ लाख रुपये कर्मचाऱ्यांना अतिरिक्त द्यावे लागणार आहे. (NMC administration infavours to shivsena UBT)
महापालिकेच्या स्थायी व अस्थायी पदावरील कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी शिवसेनेच्या म्युनिसिपल कर्मचारी कामगार संघटनेकडून करण्यात आली होती. त्यात २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे, असे म्हटले होते. महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी वीस हजार रुपये अनुग्रह अनुदान देण्याचे घोषित केल्याचे समाज माध्यमांवरून कामगार सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले.
मात्र आयुक्तांनी त्यास नकार दिला होता. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानाचे श्रेय शिवसेनेला (उबाठा) मिळेल म्हणून भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी ३०, ००० रुपये अनुदान देण्याची मागणी केली होती. मात्र महापालिका आयुक्तांनी भाजप व शिवसेनेच्या मागणीऐवजी प्रशासनाकडून २० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली. (latest marathi news)
महापालिकेत चार हजार पाचशे कायम कर्मचारी, मानधनावरील कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी यांना प्रत्येकी २० हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळेल. तर शासन अनुदानातून मानधन घेणाऱ्या क्षयरोग नियंत्रण, हिवताप व एड्स नियंत्रण, पंपिंग स्टेशन, समग्र शिक्षा अभियान आशा कर्मचारी, युनिसेफ अशा सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून महापालिकेत कार्यरत असलेल्या ५५० कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. अनुदानापोटी महापालिकेला नऊ कोटी ५५ लाख रुपये आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.
‘क्लास वन’ अधिकारी वगळले
महापालिकेच्या वर्ग एकच्या अधिकाऱ्यांना सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळणार नाही. खुद्द आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, अधीक्षक अभियंता, शहर अभियंता, आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, मुख्य लेखा परीक्षक, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सर्व कार्यकारी अभियंता सहाय्यक आयुक्त यांना सहानुग्रह अनुदान दिले जाणार नसल्याचे लेखा विभागाच्या पत्रकात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.