Nashik NMC News : महानगर नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीसह विविध कंपन्यांनी केबल टाकण्यासाठी खोदलेले रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून रस्ते दुरुस्तीअंतर्गत ५३.७७ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. (NMC Cost of 53 crores to fill potholes)
शहरातील प्रत्येक घरात घरगुती स्वयंपाक गॅसपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. मागील चार वर्षांपासून सुरू असलेले काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. पावसाळ्यात खड्डे खोदाई करण्यास मनाई असते. त्यामुळे या कालावधीसाठी काम बंद केले जाते.
कंपनीकडून आत्तापर्यंत शहरात जवळपास १२७ किलोमीटरचे खड्डे खोदण्यात आले आहे. त्यापाठोपाठ स्मार्टसिटी कंपनीकडूनही मोठ्या प्रमाणात रस्त्यांची खोदाई करण्यात आली आहे. महावितरण त्याचप्रमाणे मोबाईल कंपन्यांकडूनदेखील मोठ्या प्रमाणात रस्ते खोदकाम करण्यात आले. यानंतर बुजविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. (latest marathi news)
त्याकरिता खोदण्याची परवानगी घेणाऱ्या कंपन्यांकडून महापालिकेकडे रस्ता तोडफोड शुल्क अदा करावे लागते. खड्ड्यांमुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत रस्त्या दुरुस्ती व खड्डे बुजविण्यासाठी 53 कोटी 77 लाख रुपये खर्चाचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहे. यापूर्वीदेखील खड्डे दुरुस्तीसाठी तीस कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
विभागनिहाय रस्त्यांवर होणारा खर्च
- पूर्व - १८.८५ कोटी
- सिडको- १४.९६ कोटी
- सातपूर- १०.६७ कोटी
- पश्चिम- ९.२९ कोटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.