नाशिक : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाइन हजेरी बंधनकारक आहे. मात्र असे असतानाही महापालिकेच्या (NMC) विविध रुग्णालयांमध्ये कार्यरत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वेळेत हजर राहत नसल्याने ६२ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. विनापरवानगी गैरहजर आढळल्यास सेवा समाप्त करण्याचा इशारा नोटिशीद्वारे देण्यात आला आहे. (Nashink NMC Medical Officers marathi news)
महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी नोटीस बजावल्या आहेत. शहरात महापालिकेचे पाच मोठे रुग्णालय व चार प्रसूतिगृह आहे. यातील नाशिक रोड येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय व कठडा येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात रुग्णांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते.
परंतु महापालिकेकडे पुरेसा वैद्यकीय कर्मचारी वर्ग नसल्याने केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत वैद्यकीय अधिकारी एएनएम, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन यांची भरती करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून वेतन अदा केले जाते. परंतु त्यांचे नियंत्रण महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत केले जाते २०० पेक्षा अधिक कर्मचारी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आहे. (Latest Marathi News)
सर्व कर्मचाऱ्यांना ऑनलाइन हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे. विनापरवानगी गैरहजर राहणे व वेळेत ऑनलाइन हजेरी लावली जात नसल्याचे तक्रारी प्राप्त झाल्या. तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी केली असता तथ्य आढळल्याने वैयक्तिक विभागाकडून ६२ कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
२१ जानेवारी ते २० फेब्रुवारी या दरम्यान सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ६२ जण नियमांचे पालन करण्यात नसल्याने त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या. नोटीस बरोबरच कर्मचाऱ्यांचे वेतन कपातदेखील करण्यात आले आहे विनापरवानगी गैरहजर आढळल्यास सेवा समाप्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.