NMC News esakal
नाशिक

Nashik NMC News : महापालिकेचे प्रकल्प डोईजड! पलुस्कर, भोरे नाट्यगृहासह जलतरण तलावाचे खासगीकरण

Nashik News : प्रकल्प उभारल्यानंतर देखभाल दुरुस्तीवर होणारा खर्च डोईजड होत असल्याची बाब अधोरेखित झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik NMC News : महापालिकेकडून करोडो रुपये खर्च करून प्रकल्पांची उभारणी केली जाते. परंतु, प्रकल्प उभारल्यानंतर देखभाल दुरुस्तीवर होणारा खर्च डोईजड होत असल्याची बाब अधोरेखित झाली आहे. त्याचमुळे दोन महिन्यांपूर्वी उद्‌घाटन करण्यात आलेल्या पंचवटी विभागातील कै. सदूभाऊ भोर नाट्यगृह, पं. पलुस्कर सभागृह तसेच सातपूर विभागात नव्याने तयार करण्यात आलेल्या जलतरण तलाव आउटसोर्सिंगच्या माध्यमातून चालविण्यास दिले जाणार आहे. या माध्यमातून स्वखर्च किंवा शासनाच्या खर्चातून उभारण्यात आलेले प्रकल्प पांढरा हत्ती पोसणारा ठरत आहे. (Nashik NMC projects dozed marathi news)

महापालिकेकडून कालिदास कलामंदिर नाट्यगृह चालविले जाते. शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने नाट्यगृहाला चांगला प्रतिसाद मिळतो. मात्र कालिदास कलामंदिरावर होणारा खर्च व उत्पन्न याचा ताळमेळ बसत नाही. वीजबिल, देखभाल- दुरुस्ती तसेच कर्मचारी वर्गावर होणारा खर्च लक्षात घेता कालिदास महापालिकेसाठी पांढरा हत्ती ठरले आहे.

त्यात आता पंचवटी विभागातील कै. सदाभाऊ भोर तसेच पंडित पलुस्कर हे दोन्ही अनुक्रमे ८०० व २०५ आसन क्षमतेचे नाट्यगृह महापालिकेच्या ताब्यात आल्याने हे दोन्ही प्रकल्प महापालिकेला डोईजड ठरले आहे. अवघे दोन महिन्यांपूर्वी उद्‌घाटन झालेल्या भोर नाट्यगृहावर वार्षिक चार ते पाच कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.

तो खर्च महापालिकेला परवडणारा नाही. त्या व्यतिरिक्त कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने नव्याने नियुक्ती करणेदेखील महापालिकेला आता शक्य नाही. त्यामुळे पलुस्कर व भोर नाट्यगृह आउटसोर्सिंगच्या माध्यमातून चालविण्यास दिले जाणार आहे. महापालिकेने सातपूर विभागात नव्याने जलतरण तलाव तयार केला आहे.

या जलतरण तलावावर कर्मचारी वर्ग नियुक्त करणे शक्य नसल्याने आउटसोर्सिंगच्या माध्यमातून जलतरण तलाव चालविण्यास दिला जाणार आहे. यापूर्वी पंचवटी विभागातील मीनाताई ठाकरे स्टेडिअम बाजूला असलेला जलतरण तलाव आउटसोर्सिंग माध्यमातून चालविण्यास दिला आहे. (latest marathi news)

प्रकल्पांची वाताहात

विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनात वाढ होण्याच्या दृष्टीने महापालिकेने स्व. यशवंतराव चव्हाण तारांगण निर्मिती केली आहे. नाशिककरांना मनोरंजनाचे हक्काचे ठिकाण म्हणून पांडव लेण्यांच्या पायथ्याशी चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारक उभारण्यात आले आहे. यापूर्वी सिडकोत ॲम्युझमेंट पार्क उभारण्यात आले होते. मात्र आता त्या जागेवर नवीन उद्यान निर्मिती होत आहे. शहरात महापालिकेचे ५४७ उद्याने आहेत.

यातील बहुतांश उद्यानांची दुरवस्था झाली असून बोटावर मोजण्याइतके उद्याने सुस्थितीत सुरू आहे. एकूणच महापालिकेच्या प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. मात्र देखभाल, दुरुस्ती करताना तसेच कर्मचारी नियुक्त करताना नाकीनऊ येत असल्याने आता सर्वच प्रकल्प आउटसोर्सिंगकडे वळताना दिसत आहे.

सिटी गार्डनला लागणार तिकीट

इंदिरानगर येथील जॉगिंग ट्रॅकलगत साडेतीन एकर क्षेत्रात सिटी गार्डन उभारण्यात आले आहे. उद्यानात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने महापालिकेकडून सुविधा पुरविल्या जातात. योगा तसेच अन्य ॲक्टिव्हिटी येथे चालतात. नागरिकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन तसेच वाढता खर्च भागविण्यासाठी सिटी गार्डनमध्ये प्रतिव्यक्ती दहा रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे.

"महापालिकेकडे कर्मचारी कमतरता असल्याने कै. सदूभाऊ भोर नाट्यगृह व पं. पलुस्कर सभागृह तसेच सातपूर येथील नव्याने बांधण्यात आलेला जलतरण तलाव आऊटसोर्सिंगने चालविण्यास दिला जाणार आहे."- जयंत राऊत, मिळकत विभागप्रमुख, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT