Nashik NMC School : शाळांना सुट्ट्या लागल्याने वर्गखोल्या दुरुस्त करणे आवश्यक असते. परंतु, गेल्या तीन वर्षांपासून बांधकाम विभागाने दुर्लक्ष करून शिक्षण विभागाचा निधी रस्त्यांच्या कामांकडे वळविला आहे. अखेरीस शिक्षण विभागाकडून बांधकाम विभागाला पत्र सादर करीत शाळांच्या वर्गखोल्या दुरुस्तीची मागणी केली आहे. त्यामुळे यंदा तरी वर्गखोल्यांची दुरुस्ती होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Nashik NMC School funds to repair classrooms news)
शहरात महापालिकेच्या ८८ प्राथमिक व १२ माध्यमिक शाळा आहेत. शाळांच्या ७० इमारती आहेत. स्मार्ट सिटी कंपनीकडून ८२ शाळा या स्मार्ट स्कूल प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आल्या आहेत. परंतु, यातील जवळपास ३५ शाळांना पुरेसा वीजपुरवठा नाही. त्या व्यतिरिक्त १२ शाळांची दुरावस्था झाली आहे. शिक्षण विभागाकडून शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर वर्गखोल्या दुरुस्तीचे पत्र बांधकाम विभागाला सादर केले जाते.
मागील तीन वर्षांपासून असे पत्र देवूनही वर्गखोल्यांची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने यावर्षी पुन्हा पत्रव्यवहार करून वर्गखोल्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे. या पत्रात नाराजी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याने वर्गखोल्या अपुऱ्या पडत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. (latest marathi news)
या शाळांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव
महापालिका शाळा क्रमांक ५५ बजरंगवाडी, शाळा क्रमांक ३३ महादेवनगर (सातपूर), महापालिका शाळा क्रमांक दोन बोरगड (म्हसरूळ), महापालिका शाळा क्रमांक ४६ उपनगर (नाशिकरोड), महापालिका शाळा क्रमांक २५ राधाकृष्ण नगर (सातपूर), महापालिका शाळा क्रमांक १७ कामगार नगर (सातपूर), शाळा क्रमांक २२ शिवाजीनगर (सातपूर), शाळा क्रमांक २४ विश्वासनगर, महापालिका शाळा क्रमांक ७५ चुंचाळे (अंबड), महापालिका शाळा क्रमांक ९० पाथर्डीगाव, महापालिका शाळा क्रमांक ६ आडगाव या बारा शाळांमध्ये दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
अशी आहेत दुरुस्तीची कामे
वर्ग खोल्यांच्या खिडक्यांचे तावदाने बदलणे, दारांना कडी-कोयंडा बसविणे, खिडक्यांना जाळी बसविणे, स्वच्छतागृहांची दुरस्ती, छत गळती, नवीन वर्गखोल्या बांधणे, पत्र्यांचे शेड टाकणे, शोषखड्डा करणे, ग्रील व चॅनल गेट बसविणे.
"विविध उपक्रमांमुळे महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढत आहे. त्यात वर्गखोल्या कमी पडत आहेत. त्या शिवाय वर्ग खोल्यांची दुरुस्ती देखील गरजेची असल्याने मागणी केली आहे."- बी. टी. पाटील, प्रशासनाधिकारी, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.