Nashik NMC esakal
नाशिक

Nashik NMC : होर्डिंग कोसळल्यास ‘एसटी’ जबाबदार! महामंडळाच्या जागेवरून पोलिसांना पत्र

Nashik News : यशवंत मंडई पावसाळ्यात पडल्यास भाडेकरूंना जबाबदार धरण्याची नोटीस महापालिकेने काढल्यानंतर आता त्यापाठोपाठ एसटी महामंडळा विरोधातदेखील महापालिकेने पत्र दिले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : अत्यंत धोकादायक स्थितीत असलेली रविवार कारंजा येथील यशवंत मंडई पावसाळ्यात पडल्यास भाडेकरूंना जबाबदार धरण्याची नोटीस महापालिकेने काढल्यानंतर आता त्यापाठोपाठ एसटी महामंडळाविरोधातदेखील महापालिकेने पत्र दिले आहे. महामंडळाच्या जागेतील अनधिकृत होर्डिंग कोसळून दुर्घटना घडल्यास एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून गुन्हा दाखल करा असे पत्र सरकारवाडा. (ST corporation responsible for hoarding collapse)

मुंबई नाका व पंचवटी पोलिसांना पाठविले. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या यशवंत मंडई इमारत धोकादायक स्थितीत आहे. पावसाळ्यात कोसळल्यास व त्यातून वित्त व जीवितहानी झाल्यास महापालिका जबाबदार राहणार नसल्याचे स्पष्टीकरण नोटिशीद्वारे दोन दिवसापूर्वी देण्यात आले.

त्याचबरोबर मंडईत येणाऱ्या ग्राहकांची जबाबदारीदेखील संबंधित भाडेकरूंवर टाकल्यानंतर महापालिका प्रशासन पावसाळ्यात घडणाऱ्या दुर्घटनेबद्दल ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे. आता महापालिकेच्या जाहिरात व परवाने विभागाने होर्डिंगवरून एसटी महामंडळाला धारेवर धरले आहे. मुंबईतील घाटकोपर येथील छेडानगरमध्ये १२० बाय १२० आकाराचे भले मोठे होर्डिंग कोसळून १७ जण ठार झाले.

या दुर्घटनेनंतर राज्यातील आपत्ती व्यवस्थापन विभाग अलर्ट मोडवर आला. नाशिक महापालिकेनेदेखील शहरातील सर्व होर्डिंगचे फेरसर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या. नाशिक महापालिकेमार्फत मागील वर्षी होर्डिंग्जचे ऑडिट झाल्याने अनधिकृत असे होर्डिंग्ज आढळले नाही. मात्र सर्वेक्षणात पंचवटी बस डेपो येथे पाच, जुने सीबीएस डेपो येथे चार व महामार्ग बसस्थानक परिसरात चार असे एकूण तेरा होर्डिंग्ज अनधिकृत व धोकादायक स्थितीत आढळले. (latest marathi news)

त्यामुळे महापालिकेच्या जाहिरात व परवाना विभागाने एसटी महामंडळाला नोटीस बजावली होती. अनधिकृत व धोकादायक होर्डिंग तातडीने हटवावे, अशा सूचना दिल्या. मात्र एसटी महामंडळाकडून होर्डिंग्ज हटविण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागून घेण्यात आली. महापालिकेकडून मुदत दिली मात्र आठ दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटला तरी अनधिकृत होर्डिंग काढले गेले नाही.

त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक घेतली. त्यात दुर्घटना घडेल अशा बाबी टाळण्याच्या स्पष्ट सूचना आहेत. त्याअनुषंगाने महापालिकेत पंचवटी पोलिस ठाणे, सरकारवाडा तसेच मुंबई नाका पोलिस ठाण्याला पत्र पाठवून अनधिकृत होर्डिंग कोसळल्यास महापालिकेची जबाबदार राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दुर्घटना घडल्यास एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरावे व त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे पत्र दिले आहे.

खर्च वसूल करणार

एसटी महामंडळाच्या जागेत असलेले धोकादायक व अनधिकृत होर्डिंग हटविण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. सदर होर्डिंग्ज महापालिका हटविणार असून त्याचा खर्च व त्यावरचा दंड एसटी महामंडळातून वसूल करणार आहे. होर्डिंग हटविण्या दरम्यानच्या कालावधीमध्ये दुर्घटना घडल्यास महापालिका जबाबदार राहणार नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित तू थोडक्यात वाचलास.. वाकून नमस्कार करणाऱ्या रोहित पवारांना अजित दादांचा मिश्किल टोला

दाऊदने मला जीवे मारण्याची धमकी दिली, म्हणून...; Lalit Modi यांचा धक्कादायक खुलासा; म्हणाले, शाहरुख खान...

TRAI New Rules : मोठी बातमी! 1 डिसेंबरपासून OTP बंद होणार? ग्राहकांचा फायदा की नुकसान, नेमकं प्रकरण वाचा

Share Market Opening: शेअर बाजारात मोठी वाढ; निफ्टी 24,200च्या पार, सेन्सेक्स 1300 अंकांनी वर, कोणते शेअर चमकले?

Latest Maharashtra News Updates : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा १५ दिवसांसाठी राहणार बंद

SCROLL FOR NEXT