Nashik News : गेल्या आठवड्यात राज्य शासनाने वैजापूरच्या रामकृष्ण सहकारी जल उपसा संस्थेची कर्जमाफी केली; परंतु शासनदरबारी सोबतच फाईल असलेल्या सिन्नर तालुक्यातील गोदावरी उपसा जलसिंचन संस्थेची कर्जमाफी केली नाही. त्यामुळे शासनाच्या ह्या दुजाभावाच्या वागणुकीबद्दल बाधित शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड रोष आहे. (No loan waiver for Godavari Upsa Irrigation Society)
वास्तविक, वैजापूरचा जलसिंचन योजना सुरू होऊन बंद पडली; परंतु सिन्नरची योजना सुरूच झाली नाही आणि कोणत्याही लाभाशिवाय शेतकऱ्यांच्या जमिनींवर करोडो रुपयांचा बोजा चढवला गेला. त्यामुळे आधीच आर्थिक विवंचनेत असणाऱ्या शेतकऱ्याला अजून नैराश्येच्या गर्तेत ढकलण्याचे काम शासनाकडून होताना दिसत असल्याचे मत सिन्नर तालुक्यातील गोदावरी उपसा सिंचन योजनेतील बाधित शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
यासंदर्भात तक्रार घेऊन बाधित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने नाशिकचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांची भेट घेऊन सरकारच्या दुटप्पी धोरणांबद्दलच्या तक्रारींचा पाढाच वाचला. यापूर्वीही सदर योजनेच्या कर्जमाफीसाठी शासनदरबारी प्रयत्न करणाऱ्या राजाभाऊ वाजे यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला. (latest marathi news)
प्रसंगी स्वखर्चाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा शब्द खासदार यांनी शेतकऱ्यांना दिला. यावेळी वाजे यांचा बारागाव पिंप्री येथील ग्रामस्थांनी सत्कार केला. याप्रसंगी शेतकऱ्यांच्या शिष्ठामंडळासोबत बारागाव पिंप्री विविध कार्यकारी संस्थेचे चेअरमन चंद्रशेखर उगले, व्हा. चेअरमन बबनराव कुऱ्हाडे, संचालक दिलीप गोराडे, माजी चेअरमन अरुण खंदोडे, पाटपिंप्रीचे ग्रामपंचायत सदस्य महेश उगले.
सोमनाथ उगले, केशवराव उगले, ॲड. अनिल उगले, डॉ. भानुदास आरोटे, बाळू निकम, दशरथ रोडे, वसंतराव शहाणे, शंकर उगले, बाबाजी गोराडे, अनिल उगले, भागवत संद्रे, रवींद्र उगले, समाधान उगले, सुभाष नागरे, गणेश गोराडे, समाधान कुऱ्हाडे, कैलास उगले, गंगाराम उगले, किरण उगले, दत्ताभाऊ कळसकर, नवनाथ देवकर आदींसह तीनही गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.