Vehicles parked in front of no-parking board on Ambad Link Road. esakal
नाशिक

Nashik News : ‘नो पार्किंग’ क्षेत्र उरले नावालाच! पोलिसांचे दुर्लक्ष; सिडकोत अनेक ठिकाणी अनधिकृतपणे पार्किंग

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सिडकोतील अनेक रस्त्यांवर रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे वाहने पार्क केले जातात. यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झालेल्या आहेत. ‘नो पार्किंग’ फलक लावण्यात आलेले असूनही, नागरिकांकडून नियमांना केराची टोपली दाखविली जात आहे. चक्क त्या फलकाच्या समोरच वाहने पार्क केलेली दिसतात.

परिसरातील अनेक इमारतींच्या मुख्य प्रवेशद्वारावर येथे वाहन लावू नये अशा प्रकारचे सूचना केल्या असल्या तरी अनेक नागरिक दुचाकी आणि चारचाकी वाहने त्या प्रवेशद्वारासमोरच लावून जातात. (No parking area remains in name only police neglect in cidco)

त्यामुळे इमारतीतील रहिवाशांना वाहने काढण्यास मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते. अनेक वेळा अशा नागरिकांना या वाहनचालकांचा शोध घेण्याची वेळ येते. ‘नो पार्किंग’ ठिकाणी पार्क केलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिस कुठल्याही प्रकारची कारवाई करत नसल्याचे दिसून येते. अनेक वेळा छोट्या रस्त्यांच्या कडेला नागरिक वाहने लावून जातात. त्यामुळे या परिसरात अनेक वेळा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते.

सिटीलिंक बसमुळे अनेक वेळा तासनतास अडकून पडल्याने वाहतुकीचा खोळंबा नेहमी होतो. अनधिकृत पार्क केलेल्या वाहनांवर प्रशासन तसेच वाहतूक पोलिस लक्ष देत नाही. त्यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. या ठिकाणी अनेक वेळा अशी वाहने दोन ते तीन दिवस उभी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशा प्रकारचे ‘नो पार्किंग’ क्षेत्राचे फलक नावालाच लावले की काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. (latest marathi news)

"इमारतीबाहेर मुख्य प्रवेशद्वारावर अनेक वेळा नागरिक गाड्या लावून जातात. त्यामुळे स्वतःची गाडी काढण्यास मोठ्या प्रमाणात त्रास होतो. असे नागरिक इमारती बाहेरील बोर्ड वाचून सुद्धा या ठिकाणी वाहने लावून जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मनस्ताप होतो."

- वैभव पवार नागरिक

"पवननगर, उत्तमनगर या दाटीवाटीच्या लोकवस्तीत रस्ते लहान होत चालले आहेत. अशा रस्त्यांवर नागरिकांकडून चारचाकी वाहने सर्रास पार्क केले जातात. अशा वाहनांवर वाहतूक पोलिसांचा अंकुश दिसून येत नाही. त्यांच्यावर वेळीच कारवाई करणे गरजेचे आहे."

- सागर बच्छाव, नागरिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddique Murder : बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात? पकडलेल्या दोघांपैकी एक यूपी तर दुसरा हरियानाचा

CM on Baba Siddique: सिद्दीकी हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवणार; एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक करणार तपास; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Baba Siddiqui: कार्यक्रमाला उपस्थिती, फटाके फोडताना साधला डाव, वाचा बाबा सिद्धिकींचा हत्येचा थरार!

Baba Siddiqui Case: ...हे मोठं षडयंत्र; बाबा सिद्दिकींची हत्या चिंतेची बाब, भाजप नेत्याची प्रतिक्रिया

Samir Khan: नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचं निधन; काही दिवसांपूर्वी झाला होता अपघात

SCROLL FOR NEXT