Milk producing farmers protest with animals esakal
नाशिक

Milk Producer : अनुदान नको, दुधाला 40 रुपये भाव द्या! दूध उत्पादक शेतकरी आक्रमक

Nashik News : दुधाला अनुदान नको, फिक्स ४० रुपये भाव द्यावा, या मागणीसाठी जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राज्य सरकारने दुधाला पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केल्यानंतर दूध दराचा प्रश्न राज्यभर तापला आहे. दुधाला अनुदान नको, फिक्स ४० रुपये भाव द्यावा, या मागणीसाठी शनिवारी (ता. २९) जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले. दूध उत्पादकांनी थेट दुभते जनावरे घेऊन येत जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले. (No subsidy for milk fixed price of 40 rupees milk)

विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अनुदान देऊ नका, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी आंदोलनकांनी या वेळी केली. दूध उत्पादक शेतकरी किरण सानप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादक शेतकऱ्यांनी घारपुरे घाट रस्त्यापासून दुभत्या गायी आणत आंदोलन केले.

प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त कार्यालयापासून ही जनावरे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्याचा प्रयत्न आंदोलनकर्त्यांनी केला. मात्र, पोलिसांनी अशोक स्तंभ परिसरात त्यांना अडवत जनावरे ताब्यात घेतली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जात आंदोलन केले. येथे जोरदार घोषणाबाजी करत दूध उत्पादकांनी परिसर दणाणून सोडला.

दूध उत्पादकांमार्फत दूध दरवाढीसाठी आंदोलने, निदर्शने सुरू आहेत. राज्यात दूध उत्पादकांना न्याय मिळत नसल्याची भावना शेतकऱ्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून मांडली. इतर राज्यांच्या तुलनेत राज्यात १० ते १२ दर प्रतिलिटरमागे कमी आहे. सध्या २२ ते २७ रुपये लिटर इतका दर मिळत आहे. शासनाने जाहीर केलेला प्रतिलिटर ३४ रुपये दर हा परिपत्रकावरच राहिला आहे. (latest marathi news)

त्यापेक्षा मोठ दुर्दैव म्हणजे देशात २ लाख टनापेक्षा अधिक दूध पावडर पडून असताना, शासनाने १० हजार टन आयातीला परवानगी देत, आयातशुल्क हटविले आहे. त्यामुळे हे दर आणखी कमी होणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी या वेळी सांगत संताप व्यक्त केला. सरकारने हा शेतकरीविरोधी निर्णय मागे घ्यावा.

मागण्या लवकरात लवकर मान्य करून सरकारने दूध उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दूध उत्पादक शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात जात त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना निवेदन दिले. या वेळी आंदोलनात धम्मपाल खरात.

यश जोशी, शिवम शिरसाठ, भगवान नागरे, स्वप्नील गायकवाड, श्याम पगारे, रवी चकोर, भगवान नागरे, सुदाम ढाकणे, पोपट नागरे, ऋषीकेश पगार, अजिंक्य चकोर, बाळासाहेब चकोर, योगेश भरडे, सागर सावंत, शिवाजी मानकर, वाळीबा दराडे आदी सहभागी झाले होते.

आंदोलनकर्त्यांच्या मागण्या

- दुधाला लिटरला ४० रुपये दर मिळावा

- आम्हाला अनुदान नको फिक्स रेट द्यावा

- भेसळीच्या दुधावर कारवाई करावी

- केवळ विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून अनुदान देऊ नये; त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT