Spice
Spice  esakal
नाशिक

Nashik News : ब्रँडेड उत्पादकांकडून कीटकनाशकांचा वापर नाही; महाराष्ट्र मसाला उद्योग संघटनेचा दावा

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : भारतीय मसाला उत्पादनांमध्ये कीटकनाशके असल्याचा आरोप निराधार असून, केवळ गैरसमजातून निर्माण झाला आहे. कोणतेही ब्रँडेड उत्पादक कीटकनाशकांचा वापर करीत नाहीत, असा दावा महाराष्ट्र मसाला उद्योग संघटनेतर्फे करण्यात आला. (No use of pesticides from branded producers Maharashtra Spice Industry Association claim)

महाराष्ट्र मसाला उद्योग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले, की मसाला उत्पादक कच्चा माल कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फत (APMC) आख्खे मसाले खरेदी करून ते दळणे, मिसळणे आणि पॅक करून मसाल्यांची विक्री करतात व नेहमीच सर्वोत्तम दर्जाचा कच्चा माल वापरण्याचा प्रयत्न करतात. कोणताही ब्रँडेड मसाला उत्पादक जाणूनबुजून आपल्या उत्पादनांमध्ये ग्राहकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरेल, असे कुठलेही बाह्य कीटकनाशक मिसळत नाही.

‘एफएसएसआयए’च्या अन्नसुरक्षा आणि मानके नियमन. २०११ तसेच अन्नात कीटकनाशकाचा थेट वापर करण्यास प्रतिबंधित इतरही कायद्यांचे काटेकोरपणे पालन करतात. शेतकरी त्यांच्या पिकांचे वेगवेगळ्या प्रकारच्या कीड आणि कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी कीटकनाशकांचा वापर करतात. मात्र, त्याच्या वापराचे प्रमाण व पद्धती संपूर्णपणे शेतकऱ्यांवर अवलंबून असतात. ही कृषी उत्पादने बाजारात आणल्यावर कीटकनाशकांचे अवशेष तपासण्याची कोणतीही विशेष प्रक्रिया नाही.

जरी कायद्याने कमाल अवशेष मर्यादा (MRL) निश्चित केलेली आहे. भारतातील शेतकऱ्यांना या निकषांबद्दल आणि त्यांच्या दुष्परिणामांबद्दल पुरेशी माहिती नाही. याला सेंद्रिय शेती हा एक पर्याय उपलब्ध आहे; परंतु सेंद्रिय शेती ही एक आदर्श पद्धती असली, तरी ती संपूर्ण भारतीय लोकसंख्येला माल पुरविण्यास सक्षम नाही, या कारणास्तव रासायनिक कीटकनाशकांचा वापर पर्यायाने होत आहे. (latest marathi news)

जनजागृत्ती व अंमलबजावणीची गरज

‘एफएसएसआयए’तर्फे वितरक, उत्पादक आणि निर्यातदार स्तरांवर कीटकनाशकांसाठी अन्न नमुन्यांची तपासणी करीत आहे; परंतु याच्या मुख्य स्रोतावर नियंत्रण करणे आवश्यक आहे. भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिबंधित कीटकनाशकांचे उत्पादन आणि वितरण सर्रास सुरू आहे. त्यावर तत्काळ बंदी घालणे आवश्यक आहे.

तसेच, शेतकऱ्यांना आवश्यक कीटकनाशकांचा योग्य वापर कसा करावा आणि त्याचे दुष्परिणाम याबाबतचे मार्गदर्शन व जागरूकता निर्माण करणे जरुरीचे आहे. मात्र, प्रशासकीय स्तरावर या विषयाबाबत उदासीनता दिसून येते. ‘एफएसएसआयए’ने कीटकनाशक अवशेषांसाठी निश्चित केलेले निकष काही अंशी यूएस, युरोपियन युनियन आणि जपानसारख्या प्रगत राष्ट्रांपेक्षाही कठोर आहेत.

या निकषांवर असणाऱ्या हरकती आणि कायदा राबविताना येणाऱ्या अडचणी यावर कृषी मंत्रालय, सार्वजनिक आरोग्य मंत्रालय, स्पाईस बोर्ड, एफएसएसआयए, शेतकरी, विविध संघटना, उत्पादक आणि निर्यातदार यांनी एकत्र येऊन त्यावर तोडगा शोधून, सर्व घटकांची जबाबदारी निश्चित करून कायद्यांची योग्य अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.

मसाला उद्योगांचे मोठे नुकसान

गैरसमज निर्माण करणाऱ्या वृत्तांमुळे मसाला उद्योगांचे मोठे नुकसान होत आहे. तसे पाहिले गेल्यास हा विषय केवळ मसाल्यांपुरताच मर्यादित नसून चहा, कॉफी, भाजीपाला, डाळी, तांदूळ, फळे आदी पिकांच्याही संबंधित आहे. मात्र, या विषयी मसाला उत्पादकांनाच लक्ष्य केले जात आहे. सध्याची अस्पष्टता, अनिश्चितता आणि संशयाच्या परिस्थितीमुळे मसाला उद्योगावर प्रतिकूल परिणाम होत आहे. या प्रकरणाशी संबंधित शासकीय स्तरावर नोंद घेऊन संपूर्ण प्रकरणावर सखोल अभ्यास करून योग्य तो निर्णय घेण्यात यावा, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले.

भारतीय मसाल्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र

संघटनेतर्फे देण्यात आलेल्या माहितीत स्पष्ट करण्यात आले आहे, की ‘इटीओ’ हा एक रंगहीन वायू आहे. त्याचा वापर विविध प्रकारच्या खाद्य उत्पादनांच्या निर्जंतुकीकरणासाठी केला जाऊ शकतो. खाद्य पदार्थांकरिता ‘इटीओ’ वापरण्यास अनेक देशांमध्ये परवानगी आहे. कारण ‘इटीओ’मुळे खाद्यपदार्थांचा रंग, सुगंध, चव आणि इतर नैसर्गिक गुणधर्मांचे जतन होते.

भारतीय मसाल्यांमध्ये ‘इटीओ’च्या अतिरिक्त वापराचा अहवाल हा अत्यंत संशयास्पद वाटतो. यात सिंगापूर, हाँगकाँग, नेपाळ, मालदीव यांसारख्या काही चीनधार्जिण्या देशांचा समावेश आहे. त्यामुळे जगभरात नामांकित असणाऱ्या भारतीय मसाल्यांचा चार अब्ज डॉलरच्या व्यवसायाला डळमळीत करण्यासाठी आणि विश्वस्तरीय व्यवसायातील अग्रभागी असणाऱ्या भारतीय मसाल्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasant More: इथेही 'तेच' कारण! वसंत मोरेंनी फोडलं वंचितवर खापर; म्हणाले, प्रकाश आंबेडकरांचा मला फोन आला...

Maharashtra Live News Updates : मुंबईत महायुतीचा मेळावा,प्रमुख नेते राहणार हजर

Jasprit Bumrah : विराट-रोहितनंतर जसप्रीत बुमराहही घेणार निवृत्ती? 33 हजार चाहत्यांसमोर केला मोठा खुलासा

Rohit Sharma Video: जगाचं प्रेम वेगळं अन् आईची माया वेगळी; विजयी पुत्राला पाहताच रोहितच्या आईने काय केलं पाहाच...

Jalgaon Crime News : असोद्यात छेडखानीच्या आरोपातून मारहाणीत एकाचा मृत्यू; 6 महिला ताब्यात

SCROLL FOR NEXT