Nashik ZP News  esakal
नाशिक

Nashik ZP News : ग्रामसेवक युनियन असहकार आंदोलनावर ठाम; आंदोलनाबाबत संघटनांमध्ये फूट

Nashik News : ग्रामसेवक युनियनच्या जिल्हा शाखेने जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागातील प्रलंबित प्रश्नांविरोधात ७ जूनपासून असहकार आंदोलन करण्याबाबतचे पत्र प्रशासक आशिमा मित्तल यांना दिले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातील ग्रामसेवक कार्यमुक्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटनांतर्गत वाद उफाळून आल्यावर ग्रामसेवक युनियनच्या जिल्हा शाखेने जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागातील प्रलंबित प्रश्नांविरोधात ७ जूनपासून असहकार आंदोलन करण्याबाबतचे पत्र प्रशासक आशिमा मित्तल यांना दिले. (Gramsevak Union insists on non cooperation movement)

या पत्राची दखल घेत श्रीमती मित्तल यांनी बोलाविलेल्या बैठकीकडे युनियनने पाठ फिरविली. तर, बैठकीत सहभागी झालेल्या ग्रामसेवकांच्या इतर संघटनांनी चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगितले. दरम्यान, प्रलंबित प्रश्नांवर तोडगा न निघाल्याने ग्रामसेवक युनियन असहकार आंदोलनावर ठाम असून, शुक्रवार (ता. ७)पासून आंदोलन सुरू करणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.

तर असहकार आंदोलनात महाराष्ट्र कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटना, आदिवासी ग्रामसेवक संघटना. दिव्यांग ग्रामसेवक संघटना, संवर्ग अ कर्मचारी संघटना सहभागी होणार नसल्याचे या संघटनांकडून सांगण्यात आले. त्यामुळे या आंदोलनाबाबत संघटनांमध्ये फूट पडल्याचे दिसून येत आहे. ग्रामसेवक युनियनने प्रलंबित प्रश्नांबाबत श्रीमती मित्तल यांना मागण्यांचे पत्र ३० मेस दिले. युनियनच्या पत्राची दखल घेत प्रशासनाने गुरुवारी (ता. ६) ग्रामसेवकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक आयोजित केली होती.

बैठकीसाठी ग्रामसेवक युनियनसह तांत्रिक ग्रामसेवक संघटना, आदिवासी ग्रामसेवक संघटना, पदवीधर ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले. त्याबाबतचे पत्रही देण्यात आले. त्यानुसार श्रीमती मित्तल यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीस महाराष्ट्र कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटना, आदिवासी ग्रामसेवक संघटना, दिव्यांग ग्रामसेवक संघटना. संवर्ग अ कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थिती होते. मात्र, ग्रामसेवक युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीस दांडी मारली. (latest marathi news)

या वेळी झालेल्या बैठकीत श्रीमती मित्तल यांनी प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली. प्रलंबित प्रश्नांमधील अनेक प्रश्नांवर कार्यवाही झालेली आहे. केवळ एक ते दोन प्रश्न प्रलंबित आहेत. मात्र, त्यावर ग्रामपंचायत विभागाकडून कार्यवाही सुरू असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. बैठकीस ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा पडोळ यांच्यासह विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

"ग्रामसेवकांच्या अडचणींबाबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. प्रलंबित प्रश्नांबाबत सप्ताहात मुद्दे निकाली काढले जाणार आहेत. त्यामुळे कुठल्याही भूलथापांना बळी न पडता व खास व्यक्तींच्या वैयक्तिक कामांच्या सोयीसाठी सुरू असलेले असहकार आंदोलन आचारसंहिता, टंचाई काळात कितपत योग्य आहे? बैठक यशस्वी झाली असून, कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आमच्या संघटनांचे सर्व ग्रामसेवक कामकाज नियमित सुरू ठेवणार आहेत." - विनोद आहिरे, कोशाध्यक्ष, कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटना

"मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीचे पत्र मिळाले होते. मात्र, त्यांनी बैठकीसाठी सर्व संघटनांना एकत्रित बोलविले होते. आमच्या संघटनेचे प्रश्न वेगळे असून, मागण्या वेगळ्या आहेत. त्यामुळे आमच्या संघटनेला बैठकीसाठी स्वतंत्र बोलविण्यात यावे, अशा मागणीचे पत्र प्रशासनाला दिले होते. मात्र, प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुकारलेले असहकार आंदोलन सुरू करीत आहोत. आम्ही कामबंद आंदोलन करीत नसून, केवळ असहकार आंदोलन करीत आहोत." - संजय गिरी, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन (डीएनई-१३६)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Trending News : काॅंग्रेसचे दोन गट भररस्त्यात भिडले, तितक्यात अॅम्बुलन्स आली अन् पुढे जे घडलं...

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

SCROLL FOR NEXT