Monsoon Dealey esakal
नाशिक

Monsoon Dealey : उत्तर महाराष्ट्राला दमदार पावसाची प्रतीक्षा! गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 12 टक्के जलसाठा कमी

Monsoon Dealey : कोकण आणि विदर्भात पावसाने थैमान घातलेले असताना उत्तर महाराष्ट्राला त्यातही नाशिक जिल्ह्याला अजूनही मुसळधारेची प्रतीक्षा आहे.

सकाळ वृत्तसेवा

Monsoon Dealey : कोकण आणि विदर्भात पावसाने थैमान घातलेले असताना उत्तर महाराष्ट्राला त्यातही नाशिक जिल्ह्याला अजूनही मुसळधारेची प्रतीक्षा आहे. नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांतील धरणांमध्ये आता २८ टक्के साठा शिल्लक असून, गेल्या वर्षी हा साठा ४० टक्क्यांवर होता. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यंदा बिकट अवस्था असल्याचे दिसून येते. ( North Maharashtra is waiting for heavy rain water storage is 12 percent less )

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदुरबार या पाच जिल्ह्यांत लहान-मोठी व मध्यम स्वरूपाची एकूण ५३७ धरणे आहेत. त्यात २२ मोठे प्रकल्प, ५४ मध्यम व ४६१ लघुप्रकल्पांचा समावेश होतो. त्यांचा उपयुक्त साठा पाच हजार ९६१ दशलक्ष घनमीटर इतका असून, सद्यःस्थितीत या धरणांमध्ये एक हजार ६६६ दलघमी (२८ टक्के) इतकेच पाणी शिल्लक आहे. गेल्या वर्षी २१ जुलैला हा साठा ४० टक्क्यांवर होता. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली होती. यंदा मात्र ही चिंता अजूनही मिटलेली नाही.

धरणात साठा जेमतेमच

विभागातील २२ मोठ्या प्रकल्पांमध्येही पुरेसा साठा नसल्याचे दिसून येते. भंडारदरा (४७.१८ टक्के), निळवंडे-२ (१९.३६), हतनूर (३३.१८), वाघूर (६३.४५), अर्जुनसागर (२४.०६), भाम धरण (१७.१७), भावली (१२.५०), चणकापूर (०), दारणा (२४.३५) साठा सध्या शिल्लक आहे. (latest marathi news)

दुष्काळाचे सावट कायम

रिमझिम पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. मध्यंतरी पंधरा दिवस पाऊस न पडल्याने उभी पिके जागेवरच वाळायला लागली होती. परंतु, गेल्या आठवड्यात काही भागांत थोड्याफार प्रमाणात झालेल्या पावसामुळे मका, कापूस, सोयाबीन आदी पिकांना जीवदान मिळाले. अजूनही धरणांमध्ये पाणी न आल्यामुळे विहिरींना पाणी आलेले नाही. परिणामी, दुष्काळाचे सावट अजूनही कायम आहे. गेल्या वर्षी पावसाळा संपताच सुरू झालेले पाण्याचे टँकर अजूनही कायम आहेत. पिण्याच्या पाण्याची चिंता अद्याप मिटलेली नसल्याचे यावरून दिसून येते.

जिल्ह्यातील सहा धरणे कोरडी

नाशिक जिल्ह्यातील चणकापूर, करंजवण, ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव, वाघाड ही सहा धरणे कोरडीठाक पडली आहेत. त्यात शून्य टक्के पाणी असल्यामुळे अजूनही ‘गाळमुक्त धरण’ योजना सुरू असल्याचे दिसून येते. गेल्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये ४० टक्के साठा होता. चालू वर्षी हा साठा अवघे २६ टक्के इतका आहे.

विभागातील महत्त्वाची धरणे

धरण......क्षमता(दलघमी)......सध्या पाणी....टक्के....पाऊस (मिमी)

दारणा.....२०२...............१०५..............५२.........३५६

गंगापूर्.....१५९...............५३...............३३........३८७

भंडारदारा.....३०४..............१४३............४७.........१५२८

मूळा..........६०८..............१३३.............२१.........२२२

गिरणा........५२३..............६१...............११.........१०४

हतनूर.........२५५..............८५...............३३.........३०५

वाघूर...........२४८..............१५७.............६३.........१६५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT