number of malnourished children reduced in 2 months esakal
नाशिक

Malnourished Children : कुपोषित बालकांची संख्या 2 महिन्यांत घटली! स्तनपान, पोषण कार्यक्रम व सुरगाणा पॅटर्न यशस्वी

Nashik News : जिल्ह्याला कुपोषणमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी पाऊल उचलले.

सकाळ वृत्तसेवा

विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हा कुपोषणमुक्त करण्याच्यादृष्टीने जिल्हा परिषद प्रशासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या सुरगाणा पॅटर्न, प्रभावी स्तनपान प्रशिक्षण परिणाम दिसू लागले आहेत. मार्च, एप्रिलची तुलना केल्यास जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या तब्बल १७७ ने घटली आहे. मार्चमध्ये तीव्र आणि मध्यम कुपोषित बालकांची संख्या दोन हजार २४३ होती, ही संख्या एप्रिलमध्ये दोन हजार ६६ वर आली आहे. (number of malnourished children reduced in 2 months)

यातही आदिवासी तालुक्यात कुपोषण घटण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. नाशिक जिल्ह्यातील कुपोषणाबाबत गेल्या वर्षी मोठी ओरड झाली होती. राज्यपाल रमेश बैस यांनी नाशिक दौऱ्यात जिल्ह्यातील कुपोषणावर चिंता व्यक्त केली होती. याशिवाय माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कुपोषणावर नाराजी व्यक्त केली होती.

त्यावर जिल्ह्याला कुपोषणमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी पाऊल उचलले. त्यासाठी जिल्हा परिषद आणि आयआयटी, मुंबई यांच्यातर्फे जिल्हाभरात प्रभावी स्तनपान व पोषण कार्यक्रम फेब्रुवारीत राबविण्याचा निर्णय घेतला. यात या कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या ३०० प्रशिक्षणार्थींचे सहा महिन्यांचे प्रशिक्षण देत त्यांना प्रत्यक्ष फिल्डवर उतरविले.

या प्रशिक्षणार्थींना कुपोषित बालकांच्या मातांना स्तनपानासाठी ‘क्रॉस कॅन्डल होल्ड’ या पद्धतीने स्तनपान करण्यावर भर देण्यास सांगितले. तसेच प्रभावी लॅचिंग, स्तनपान करताना सुरवातीचे संकेत कसे ओळखावे, गर्भवतीने गरोदरपणात घ्यावयाचा पोषण आहार व बाळाच्या सहा महिने वयानंतर सुरू करण्यात येणाऱ्या पूरक आहारावर विशेष भर देण्याबाबत धडे दिले. याशिवाय, अतिगंभीर कुपोषित आणि मध्यम गंभीर कुपोषित बालकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

पौष्टिक आहार मिळत नसल्याने कुपोषित बालके होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने त्यांना कोंबड्या देऊन त्या माध्यमातून बालकांना अंडे मिळावीत, या उद्देशाने कुपोषित बालकांच्या पालकांना कोंबड्या देण्याचा निर्णय घेतला होता. या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात सुरगाणा तालुक्यातील ३४ बालकांची निवड करून त्यांच्या पालकांसाठी कोंबड्या दिल्या गेल्या. या दोन्ही उपक्रमांचे परिणाम प्रामुख्याने एप्रिलमध्ये दिसून आले. मार्चच्या तुलनेत या महिन्यातील कुपोषित बालकांची संख्या कमी झाली आहे. (latest marathi news)

एप्रिलमध्ये घटले कुपोषण

मार्चमध्ये जिल्ह्यातील २६ प्रकल्पांत पाच हजार १०९ अंगणवाडी केंद्रावर तीव्र कुपोषित ३०९ बालके होती. एक हजार ९३४ मध्य कुपोषित अशी एकूण दोन हजार २४३ बालके कुपोषित होती. एप्रिलमध्ये तीव्र कुपोषित बालकांमध्ये ५७, मध्यम कुपोषित बालकांत १२० अशा एकूण १७७ ने घट झाली. या महिन्यात तीव्र कुपोषित २५२, मध्यम कुपोषित एक हजार ८१४ बालके होती.

तुलनात्मक तक्ता

मार्च २०२४ एप्रिल २०२४

तालुके प्रकल्प एकूण अंगणवाडी केंद्र तीव्र मध्यम तीव्र मध्यम

९ आदिवासी क्षेत्र २६३१ २०४ ११९६ १६२ ११०२

६ बिगर आदिवासी क्षेत्र २४७८ १०५ ७३८ ९० ७१२

१५ एकूण प्रकल्प २६ ५१०९ ३०९ १९३४ २५२ १८३४

आदिवासी तालुक्यात सर्वाधिक घट

बिगर आदिवासीपेक्षा आदिवासी तालुक्यात कुपोषण होण्याच्या प्रमाणाची टक्केवारी २० टक्के आहे. पेठ तालुक्यात ३२ तीव्र कुपोषित बालके होती. ती एप्रिलमध्ये २६ वर आली. सुरगाणा प्रकल्पावर मार्चमध्ये २९ तीव्र कुपोषित बालके होती, ती एप्रिलमध्ये २३ वर आली आहे. याशिवाय २१ बालके ही मध्यम कुपोषित बालक श्रेणीत गेली आहेत, तर १३ बालके ही सर्वसामान्य श्रेणीत गेली आहेत. इगतपुरी तालुक्यात ४१ तीव्र कुपोषित असलेली बालके ही एप्रिलमध्ये थेट २४ वर आली. त्र्यंबकेश्वर प्रकल्पात १५ तीव्र कुपोषित बालकांची असलेली संख्या नऊवर पोचली आहे.

आशिमा मित्तल सरसावल्या

जिल्हा कुपोषणमुक्त करण्याचा निश्चय करत मित्तल यांनी दोन महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतले. याचे परिणाम दिसू लागले आहेत. आता पुन्हा पावसाळा सुरू झाल्यानंतर कुपोषित बालकांची संख्या वाढते, हा पूर्वानुभव लक्षात घेऊन मित्तल यांनी आतापासूनच कुपोषणावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी त्यांनी प्रकल्प बालविकास अधिकाऱ्यांच्या बैठकीत तीव्र कुपोषित बालकांच्या तयार करण्यात आलेल्या प्रोफाइलवर सखोल चर्चा केली.

दर महिन्याला या बालकांचे प्रोफाइल अपडेट करण्यात यावे, तीव्र कुपोषित बालकांसाठी विविध विभागांच्या समन्वयातून त्यांचे वजन सुधारण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्या. यासाठी प्रकल्पनिहाय अॅक्शन प्लॅन तयार करावा, अशा सूचना मित्तल यांनी या वेळी दिल्या.

आयआयटी, मुंबईतर्फे देण्यात आलेले प्रशिक्षण मास्टर ट्रेनर्सच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना देण्यात यावे, प्रशिक्षित अंगणवाडी सेविका यांच्याकडून गृहभेटीवेळी स्तनपानाच्या विशेष पद्धती, पूरक पोषण आहार याबाबत कुपोषित बालकांच्या पालकांना मार्गदर्शन करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी या वेळी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT