Water tankers (file photo) esakal
नाशिक

Nashik Monsoon News : दुष्काळी तालुक्यातील टॅंकरची संख्या घटली! जिल्ह्यात 350 टॅंकर सुरू

Nashik News : जिल्ह्यात प्रामुख्याने पूर्व भागातील दुष्काळी तालुक्यात मॉन्सूनचे दमदार आगमन झाले आहे. त्यामुळे या भागातील टॅंकर झपाट्याने कमी होऊ लागले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्ह्यात प्रामुख्याने पूर्व भागातील दुष्काळी तालुक्यात मॉन्सूनचे दमदार आगमन झाले आहे. त्यामुळे या भागातील टॅंकर झपाट्याने कमी होऊ लागले. गत आठवडाभरात तब्बल ३३ टॅंकर कमी झाले आहेत. दुष्काळी तालुक्यात टॅंकर कमी होत असले, तरी बिगर दुष्काळी तालुक्यात पावसाची प्रतीक्षा असल्याने येथील टॅंकरची संख्या कमी झालेली नाही. (number of tankers in drought taluk decreased 350 tankers started in district)

सद्यस्थितीत एक हजार २३५ गाव-वाड्यांना ३५० टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सर्वाधिक टॅंकर सुरू असलेल्या नांदगाव तालुक्यात आतापर्यंत ३० टॅंकर घटले असून, आता ४२ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पावसामुळे वर्षभरापासून टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता.

प्रामुख्याने पूर्व भागातील नांदगाव, मालेगाव, चांदवड, देवळा, बागलाण, सिन्नर या दुष्काळी तालुक्यांत सर्वाधिक टॅंकर सुरू होते. नांदगाव तालुक्यात तर, टॅंकरची शंभरीकडे वाटचाल सुरू होती. मात्र, जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व मृग व वळिवाच्या पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १०४.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

प्रामुख्याने दुष्काळी तालुके असलेल्या नांदगाव, सिन्नर, मालेगाव, चांदवड, बागलाण, देवळा या भागात दमदार आगमन झाले आहे. नांदगाव तालुक्यात दरवर्षी जूनअखेर सरासरी ८० मिलिमीटर पाऊस होत असतो. मात्र, यंदा जून संपण्यास कालावधी शिल्लक असताना १२४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर, सिन्नरमध्ये १२२ मिलिमीटर मालेगावमध्ये ९८ मिलिमीटर पाऊस झाला. (latest marathi news)

या झालेल्या पावसामुळे या भागातील पिण्याच्या पाण्याचे टॅंकर कमी होऊ लागले आहेत. दुसरीकडे मात्र, पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी भागात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे या भागातील टॅंकरची संख्या कमी झालेली नसून, ‘जैसे थे’ आहे. सुरगाणा तालुक्यात आठवडाभरात दोन टॅंकर वाढले आहेत.

अशी होत आहे टॅंकरमध्ये घट

ता. ७ जूनला जिल्ह्यात ३६२ गावे व ९४१ वाड्या अशा एकूण एक हजार ३०३ वाड्यांना ३९९ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. यात १४ जूनला १८ टॅंकरची घट झाली होती. गत आठवड्यात जिल्ह्यातील ३५३ गावे व ९२० वाड्या अशा एकूण एक हजार २७३ गाव-वाड्यांना ३८३ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. २१ जूनला यात ३३ टॅंकरची घट झाली. आता २५० टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

तालुकानिहाय सुरू असलेले टॅंकर

त्र्यंबकेश्वर (२), इगतपुरी (१६), पेठ (१६), सुरगाणा (२१), चांदवड (२८), देवळा (३२), बागलाण (४७), सिन्नर (३५), मालेगाव (५०), येवला (६०), नांदगाव (४२), नाशिक (१).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

मतदान कर्मचाऱ्यांना यंदा भत्ता मिळणार ऑनलाईन! ट्रायल पेमेंटसाठी आज 1 रुपया पाठवला जाईल; बॅंक खात्यांची होईल खात्री अन्‌ बुधवारपासून उर्वरित रक्कम मिळणार

SCROLL FOR NEXT