retirement esakal
नाशिक

Nashik News : निवृत्तीच्या उंबरठ्यावर अंमलदारांना ‘पीएसआय’ नियुक्तीची प्रतीक्षा

Nashik : अकरा वर्षांपूर्वी खात्यांतर्गत पोलिस उपनिरीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही अंमलदार ‘पीएसआय’ नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : अकरा वर्षांपूर्वी खात्यांतर्गत पोलिस उपनिरीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही अंमलदार ‘पीएसआय’ नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यातील ६२० अंमलदारांनी अडीच महिन्यांपूर्वीच पसंतीक्रम कळविला. परंतु, अद्यापही त्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी न झाल्याने त्यांच्यात अस्वस्थता पसरली आहे. पोलिस खात्यांतर्गत २०१३ मध्ये उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. ( Officers on brink of retirement await PSI appointment )

यासंदर्भात न्यायालयात खटला दाखल झाल्याने प्रकरण रेंगाळले होते. दरम्यान, ऑक्टोबर २०२३ मध्ये सेवाज्येष्ठतेनुसार एक हजार ४८८ अंमलदारांची माहिती मागविण्यात आली. त्यापैकी ६६० परीक्षा उत्तीर्ण अंमलदारांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड केली गेली. डिसेंबर २०२३ मध्ये त्यांच्याकडून पदोन्नतीसाठी पदस्थापना संवर्गही मागविले गेले.

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे राज्यभरातील ६२० उपनिरीक्षकांच्या नियुक्त्या रखडल्या. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्याने निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या राज्यातील ६२० उपनिरीक्षक नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. यात नाशिक शहर आयुक्तालयातील ८८ अंमलदारांचाही समावेश आहे. (latest marathi news)

उपनिरीक्षकांच्या बदल्या

राज्यातील उपनिरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी झाले आहेत. यानुसार नाशिक ग्रामीणचे उपनिरीक्षक संदीप पाटील व नाशिक शहरातील नेहा सूर्यवंशी यांची महिला सुरक्षा पथकात, नाशिक ग्रामीणचे सचिन लहामगे यांची मुंबई शहरात बदली झाली. नाशिक ग्रामीणचे सुरेश चौधरी, सुप्रिया अंभोरे, जळगावचे भय्यासाहेब देशमुख, रमेश शेंडे, पिंपरी-चिंचवडचे बबन गावित, पंडित अहिरे, नंदुरबारचे पुंडलिक पावशे, पुण्यातील राकेश न्हाळदे, गडचिरोलीचे मनोहर क्षीरसागर यांची नाशिक आयुक्तालयात नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई शहरचे अजिनाथ आंधळे, स्वप्नील पाटील, कल्याणी पाटील, पुण्यातील राहुल राजपूत, नागपूरचे विकास जाधव, अकोल्याचे मुकुंद देशमुख, महिला सुरक्षा पथकाचे राजकुमार तडवी, गोंदियाचे सुशील सोनवणे, हर्षल भोळे, गडचिरोलीचे किरण उघडे, मोहन पाटील, कैलास माळी, नंदकुमार शिंब्रे यांची नाशिक परिक्षेत्रात बदली झाली आहे. शहर आयुक्तालयाचे उपनिरीक्षक विजय लोंढे यांना मुदतवाढ देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT