central team during the discussion with actual farmers during the auction process in Lasalgaon market committee on Tuesday. esakal
नाशिक

Nashik News : शेतकरी, व्यापारी वर्गाच्या अडीअडचणींवर चर्चा; केंद्राच्या अधिकाऱ्यांची लासलगाव बाजार समितीस भेट

Nashik News : केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. २) लासलगाव बाजार समितीस भेट दिली.

सकाळ वृत्तसेवा

लासलगाव : कांदा या शेतमालाचे उत्पादन, उत्पादनासाठी येत असलेला खर्च व त्यास मिळत असलेले बाजारभाव तसेच कांदा निर्यातीसाठी निर्यातदारांना येत असलेल्या अडीअडचणींसंदर्भात प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. २) लासलगाव बाजार समितीस भेट दिली. (Lasalgaon Market Committee)

भेटीप्रसंगी अधिकाऱ्यांनी बाजार समितीत चालू असलेल्या लिलाव प्रक्रियेची पाहणी करून तेथे कांदा विक्रीस आलेल्या शेतकरी वर्गाशी कांदा आवक व बाजारभावाबाबत चर्चा करून त्यांचे प्रश्न व मागण्या जाणून घेतल्या. केंद्रीय विपणन व तपासणी संचालनालयाचे उपकृषी पणन सल्लागार बी. के. पृष्टी, किमान किंमत समर्थन उपायुक्त बिनोद गिरी, फलोत्पादन (सांख्यिकी) उपसंचालक पंकज कुमार, विपणन व तपासणी संचालनालयाच्या विपणन अधिकारी सोनाली बागडे यांनी भेट दिली.

या वेळी लासलगाव व परिसरात नाफेड आणि एनसीसीएफमार्फत चालू असलेल्या खरेदी केंद्राची उपस्थिती शेतकऱ्यांकडे विचारणा करून कांदा खरेदीची प्रक्रिया आणि त्यातील त्रुटींबाबत चर्चा केली. बाजार समितीच्या कार्यालयास भेट देऊन तेथे उपस्थित शेतकरी, व्यापारी प्रतिनिधी व बाजार समितीच्या सदस्य मंडळाकडून मागील पाच वर्षांत झालेल्या कांदा आवक, बाजारभाव व निर्यातीची माहिती घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

या वेळी बाजार समितीतर्फे आलेल्या अधिकारी वर्गासह नुकतीच ऑल इंडिया अनियन एक्स्पोर्ट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी विकास सिंह, सहसचिवपदी ओमप्रकाश राका व नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनच्या सहसचिवपदी प्रवीण कदम यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी बाजार समितीचे उपसभापती गणेश डोमाडे. (latest marathi news)

सदस्य राजेंद्र डोखळे, जयदत्त होळकर, भीमराज काळे, संदीप दरेकर, प्रवीण कदम, रमेश पालवे, सचिव नरेंद्र वाढवणे, व्यापारी प्रतिनिधी विकास सिंह, ओमप्रकाश राका, मनोज जैन, शेतकरी प्रतिनिधी अर्जुनतात्या बोराडे, दिलीप गायकवाड, सुरेश शिरसाठ, निवृत्ती न्याहारकर, मारुती मोरे, दगू गवारे, रामकृष्ण बोंबले, शिवाजी उगलमुगले, गोरख संत, बाळासाहेब धुमाळ, माधव निचित, सुभाष गवळी, भाऊसाहेब भंडारे आदी उपस्थित होते.

भेटीतील घडामोडी

-कांदा लिलावाची माहिती घेत केली शेतकऱ्यांशी चर्चा.

-नाफेड-एनसीसीएफच्या कांदा खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा शेतकरी संघटनेचा आरोप.-आम्ही शेतकरीहितासाठी आलो; नाफेड-एनसीसीएफ चौकशीसाठी नाही.

-लासलगाव बाजार समितीत व्यापारी, संचालक व शेतकरी शिष्टमंडळाशी केंद्रीय पथकाची चर्चा.

"लासलगाव बाजार समितीत आम्ही शेतकऱ्यांशी चर्चा करायला आलो आहोत. कांदा उत्पादकांसमवेत दीर्घ चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या वेळी शेतकऱ्यांनी नाफेड-एनसीसीएफने कांदा खरेदीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. मात्र आम्ही कांदाप्रश्नावर शेतकरीहितासाठी आलो आहे. नाफेड-एनसीसीएफ चौकशीसाठी नाही."- विजय पृष्टी, आयुक्त, कृषी विभाग, शेतकरी कल्याण

"बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकरी यांच्याशी संवाद साधल्यानंतर केंद्रीय पथक, बाजार समिती संचालक मंडळ, कांदा व्यापारी व शेतकरी यांच्यात बाजार समिती मुख्यालयात बैठक झाली. बैठकीत कांद्यावरील निर्यातमूल्य व निर्यात शुल्क रद्द करून जास्तीत जास्त कांदा कसा निर्यात होईल, शेतमालावरील कर रद्द करावा, कांद्याला बाजारभाव चांगला मिळत असताना कांद्यावर निर्बंध लादू नये, अशी मागणी केली." - जयदत्त होळकर, सदस्य, मुंबई बाजार, समिती

"केंद्रीय पथक शेतकऱ्यांच्या बांधावर पोचले, की कांद्याचे भाव घसरतात, कांद्यावर निर्यातबंदी लावली जाते असा आतापर्यंतचा शेतकऱ्यांना आलेला अनुभव आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत कांदाप्रश्नावर उत्तर महाराष्ट्रात भाजप महायुतीच्या उमेदवारांना बसलेला फटका यावरून केंद्राला आलेली जाग अन् त्यामुळेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हित डोळ्यापुढे ठेवून हे पथक पुढे काय अहवाल पाठवते व त्यातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काय दिलासा मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे." - निवृत्ती न्याहारकर, कांदा उत्पादक शेतकरी

"एकीकडे सरकार शेतकऱ्यांना कांद्याला योग्य भाव मिळावा म्हणून थेट दिल्लीतून समिती पाठवितात, तर दुसरीकडे कांद्याला दोन पैसे भाव मिळाल्यानंतर तेच केंद्र सरकार कांद्यावर निर्यातबंदी लादून शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करतात, हे दुटप्पी धोरण शेतकरीहिताला हानिकारक आहे." - बाळासाहेब क्षीरसागर, सभापती, बाजार समिती, लासलगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT