The speed with which the idol of Bappa was made. esakal
नाशिक

Ganeshotsav 2024 : ‘गणेशोत्सव’ निमित्त बाप्पांच्या मूर्ती कामाला वेग; सुमारे 60 टक्के मूर्ती तयार

युनूस शेख : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गणेशोत्सवाच्या आगमनाने बाप्पांच्या मूर्ती तयार करण्याच्या कामास वेग आला आहे. शहराच्या विविध भागात मूर्तिकारांकडून आकर्षक मूर्ती साकारण्याचे काम सुरू आहे. नाविन्यपूर्ण मुर्त्यांसह पारंपारिक पद्धतीच्या लहान मोठ्या मुर्ती तयार करण्यात आल्या आहे. त्यांची रंगरंगोटीसह विविध प्रकारचे कामे केली जात आहे. आतापर्यंत सुमारे ५० ते ६० टक्के मुर्त्या तयार झाल्या आहेत. (On occasion of Ganeshotsav Bappa idol work is speeding up About 60 percent of statue is complete)

अवघ्या दीड महिन्यावर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. ७ सप्टेंबरला उत्सवास प्रारंभ होणार आहे. शहरासह जिल्हाभरात घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळाकडून गणपती बाप्पांची स्थापना केली जाते. त्यानिमित्ताने लहान मोठ्या मुर्त्या तयार करण्याच्या कामास वेग आला आहे. जानेवारी ते मे महिन्यापासून मूर्तिकार मूर्ती तयार करण्याच्या कामात व्यस्त होत असतात.

लहान मोठ्या सर्व प्रकारच्या मूर्ती उत्सवाच्या दोन महिन्यापूर्वी तयार करून ठेवल्या जातात. एक महिना अवधी राहिल्यास बाप्पांच्या मूर्तीची रंगरंगोटी आणि शृंगार करण्याच्या कामास प्रारंभ होत असतो. सध्याही जुने नाशिकसह शहरभरातील मूर्तिकारंकडे अशा प्रकारच्या कामांना वेग आल्याचे दिसून येत आहे.

आतापर्यंत ५० ते ६० टक्के मुर्ती तयार झाल्याची माहिती मूर्तीकारांकडून देण्यात आली. यंदा विविध प्रकारच्या कच्च्या मालात १५ टक्के दरवाढ झाली आहे. त्याचा परिणाम मूर्ती विक्रीवर होणार आहे. मुर्त्यांच्या दरांमध्येही सुमारे दहा ते पंधरा टक्के वाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तवली आहे. (latest marathi news)

कच्च्या मालात रंगापेक्षाही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. यावर्षी मूर्तीच्या उंचीस घेऊन कुठलेही प्रतिबंध नसल्याने एक फुटापासून ते आठ फुटापर्यंत विविध रुपातील मूर्ती साकारल्या जात आहे. लालबागचा राजा आणि दगडूशेठ हलवाई यांची अधिक मागणी असल्याने याच मूर्ती अधिकतर तयार केल्या जात आहे.

अयोध्यातील राम मूर्तीच्या धरतीवर बाप्पाची मूर्ती

आयोध्यामध्ये कमानीतील उभ्या स्वरूपाच्या राममूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर यंदा उभ्या अवस्थेतील बाप्पाची मूर्ती बाजारात विक्रीस उपलब्ध होणार आहे. अशी मूर्ती साकारण्याचे काम सध्या सुरू आहे. गणेशोत्सवात बाप्पांची स्थापना केली जाते. त्यामुळे शक्यतो उभ्या मूर्तीस मागणी होत नाही. त्यामुळे अशा मुर्त्या कमी प्रमाणात साकारण्यात येत असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.

महापालिकेकडून नोटीस

प्लास्टर ऑफ पॅरिसपासून मूर्ती साकारणाऱ्या कारागिरांना महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आल्या आहे. नोटीस बजावण्याच्यापूर्वीच अनेक मूर्तिकारांच्या मूर्ती पूर्वीपासूनच तयार झाले आहे. त्यामुळे मूर्तिकारांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण आहे.

राजस्थानी मूर्तिकारांचा परिणाम दरवर्षी शहराच्या विविध भागात राजस्थानी मूर्तिकार

शेवटच्या टप्प्यात येत असतात. कमी वेळेत अधिक मूर्ती तयार करून इतर विक्रेत्यांपेक्षा कमी दरात मूर्ती विक्री केल्या जातात. त्याचा परिणाम स्थानिक व्यवसायावर होत असतो. सुमारे १५ ते २० टक्के परिणाम झाल्याचे आढळून येते. असेही स्थानिक मूर्तिकारांकडून सांगण्यात आले. साधारण ऑगस्ट महिन्यापासून बाप्पाची मूर्ती बुकिंग होण्यास सुरवात होत असते.

"कच्च्या मालांच्या घरांमध्ये वाढ झाल्याने. मूर्तीच्या घरांमध्ये वाढ होणार आहे. अवघ्या दीड महिन्यांवर उत्सव येऊन ठेपल्याने मूर्ती तयार करण्याच्या कामास वेग आला आहे. नागरिकांमध्येही उत्साह दिसून येत आहे. मूर्ती साकारण्याचे काम नागरिकांना आकर्षित करत आहे." - संजय परदेशी, मूर्तिकार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT