Ladki Bahin Yojana esakal
नाशिक

Ladki Bahin Yojana : एक लाख 10 हजार महिला लाडक्या बहीण योजनेस मुकणार, महिलांमध्ये कागदपत्र जमविण्याची धावपळ सुरू

सकाळ वृत्तसेवा

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत जिल्ह्यातील दीड लाख महिलांचे अर्ज दाखल झालेले असताना सुमारे एक लाख दहा हजार महिला या योजनेपासून वंचित राहणार आहेत. शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेतून त्या दीड हजार रुपयांचा लाभ घेत असल्याने त्या लाडक्या बहीण योजनेस अपात्र ठरल्या आहेत. राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यापासून महिलांमध्ये कागदपत्र जमविण्याची धावपळ सुरू झाली आहे. (One lakh 10 thousand women will miss Ladki Behna Yojana )

जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ४४ हजार महिलांनी ऑनलाइन व ऑफलाइन स्वरूपात नोंदणी केली आहे. पण संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी, श्रावणबाळ, अपंगांना पेन्शन या चार योजनांमार्फत महिन्याला साधारणतः दीड हजार रुपये दिले जातात. नाशिक शहरात या योजनांचे दहा हजार २६० लाभार्थी आहेत. तर संपूर्ण जिल्ह्यात एक लाखावर लाभार्थी असल्यामुळे एक लाख दहा हजारांवर महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करता येणार नाही.

याशिवाय ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे, कुटुंबातील सदस्य आयकर करदाता आहे, सरकारी नोकर, निवृत्तिवेतन घेणारेही अपात्र ठरणार आहेत. परंतु, बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी या योजनेस अपात्र ठरणार आहेत. कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे चारचाकी वाहने नावावर असल्यास (ट्रॅक्टर वगळून) अपात्र ठरणार आहेत. (latest marathi news)

दरम्यान, महिला, मुलींना सुविधा देताना रोजगारनिर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे, महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून मुलांच्या आरोग्य, पोषण स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने या योजना राबविल्या जात आहेत.

निराधारांना हवा आधार

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी या महिलांना पात्र ठरवले पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ महिलांनी व्यक्त केली आहे. सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शासन इतर योजनांच्या माध्यमातून दीड हजार रुपये देते. पण तेवढ्यात वैद्यकीय खर्चही निघत नाही. औषधोपचार व इतर खर्च मोठ्या प्रमाणात होत असल्याने दीड हजार रुपयांत महिना काढणे अवघड झाले आहे. त्यामुळे निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनाही लाडक्या बहीण योजनेत समाविष्ट करून घेण्याची मागणी महिलावर्गाकडून होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganpati Visarjan: पुण्यात गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांचा चोप, पोलीस थेट डीजेवर चढले! नेमकं काय घडलं?

Stock Market Record: शेअर बाजारात नवा विक्रम! निफ्टी 25,500च्या जवळ, सेन्सेक्स 83,300 पार

Latest Maharashtra News Live Updates: आमदार अपात्रता प्रकरणी आजही सुनावणी होणार नाही

Gold Import: भारतीयांमध्ये सोन्याची क्रेझ वाढली! सोन्याच्या खरेदीने केला नवीन रेकॉर्ड

Mumbai Dharavi Crime: मास्क लावून 60 वर्षीय आरोपी घरात शिरला..अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पण एका गोष्टीमुळे बिंग फुटलं

SCROLL FOR NEXT