Farmers objected to the work of blocking the highway. esakal
नाशिक

Nashik News : देवळ्यात महामार्गाच्या कामास पुन्हा ब्रेक! लगतच्या क्षेत्राची मोजणी करण्याचा प्रश्न ऐरणीवर

Nashik : राष्ट्रीय महामार्ग रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांनी घेत काम बंद पाडल्याने तालुक्यात सुरू असलेले महामार्गाचे काम पुन्हा बंद पडले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गटधारक शेतकऱ्यांच्या क्षेत्रांची मोजणी होत नाही तोपर्यंत काम सुरू होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका राष्ट्रीय महामार्ग रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांनी घेत काम बंद पाडल्याने तालुक्यात सुरू असलेले महामार्गाचे काम पुन्हा बंद पडले आहे. उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी शेतकऱ्यांची बैठक घेतली. मात्र बैठकीत तोडगा न निघाल्याने काम बंद ठेवण्यात आले आहे. (nashik ongoing highway works in deola taluka has been stopped again marathi news)

दरम्यान शेतकऱ्यांकडून वारंवार काम बंद पाडण्यात येत असल्यामुळे होत असलेल्या आर्थिक नुकसानीने त्रस्त झालेल्या रस्ता बांधकाम कंपनीने याबाबत योग्य तोडगा काढून सदर अडथळा दूर करावा अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे केली आहे. विंचूर प्रकाशा या राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्ग ७५२ चे काम गेल्या वर्षापासून सुरू आहे. मंगरूळ फाटा ते भावडबारी घाटाचा पायथा काम पूर्ण झाले असून रस्ता वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे.

परंतु भावडबारी घाटाचा उत्तरेकडचा पायथा ते सटाणा रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर या मार्गावरील देवळा, सटाणा, लोहोणेर, सटवाईवाडी, सुभाषनगर, भावडे आदी गावातील शेतकऱ्यांच्या रस्ते कामासाठी जमिनी अधिग्रहण व त्या मोबदल्याबाबत संभ्रम निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी हरकती घेऊन भावडे ते रामेश्वर फाटा हे काँक्रिटीकरणाचे काम बंद पाडले.

यापूर्वी २४ फेब्रुवारी रोजी आमदार डॉ.राहुल आहेर, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत १५ मार्चपर्यंत भुमी अभिलेख व इतर संबंधित यंत्रणा यांच्यामार्फत गुंजाळनगर, सुभाषनगर, रामेश्वर व भावडे येथील काही शेतकरी यांचे गटनंबरची मोजणी करून व ब्रिटिशकालिन नोंदी व इतर तत्सम पुरावे सादर करून पुर्वीचे रस्ता हद्द संपादन व लगतच्या शेतकऱ्यांच्या हद्दीसंबंधीत विषय मार्गी लावण्याचे आदेश दिले होते. परंतु महिना उलटला तरी शासनाने कार्यवाही न केल्यामुळे शेतकऱ्यांनी काम बंद पाडले. (latest marathi news)

काम सोडून देण्याचे संकेत

उपविभागिय अधिकारी कडलग, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, भुमी अभिलेख, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आदींच्या उपस्थितीत देवळा तहसील कार्यालयात शेतकऱ्यांची बैठक घेऊन सामोपचाराने मार्ग काढण्याची शासनाच्या वतीने सांगण्यात आले. परंतु शेतकरी त्यांच्या गटांची मोजणी झाल्याशिवाय काम करू देणार नाही या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे महामार्गाचे काम थांबले आहे.

अपघात वाढण्याची शक्यता

भावडबारी घाट ते रामेश्वर फाट्यापर्यंत एका लेनचे काम पूर्ण झाले आहे. दोन्ही बाजूकडून जाणाऱ्या वाहनांसाठी पूर्व बाजूकडील एक लेन खुली करण्यात आली असून वाहने सुसाट गतीने या रस्त्याने जात आहेत. परंतु या अरुंद मार्गावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने, तसेच समोरून येणाऱ्या, व ओव्हरटेक करताना वाहनाच्या गतीचा अंदाज न आल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता वाढली आहे.

''पूर्वी १० ते १२ मीटर रुंदी असलेल्या राज्य मार्गाचे रूपांतर २६ मीटर रुंदीच्या राष्ट्रीय महामार्गात करताना शासनाने शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नाही.''- हरीश्चंद्र आहेर, शेतकरी, सुभाषनगर)

''जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे संबंधित विभागांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. यामुळे जोपर्यंत गटांची मोजणी होत नाही तोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होऊ देणार नाही.''-चंद्रकांत आहेर, सरपंच, सरस्वतीवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लोकसभेचा उत्साह सातव्या आसमानावर; विधानसभेत भ्रमाचा भोपला फुटला, काँग्रेसच्या आत्मविश्वासानं MVAचा खेळ केला?

Abhimanyu Pawar won Aausa Assembly Election : औसा मध्ये फडकला भाजपाचा झेंडा! अभिमन्यू पवारांचा भव्य विजय

Kopri Pachpakhadi Assembly Election 2024 Result: येऊन येऊन येणार कोण! कोपरी पाचपाखाडीत एकनाथ शिंदेंचा एकहाती विजय; केदार दिघेंचा लाजिरवाणा पराभव

Karveer Assembly Election 2024 Results : करवीर मतदारसंघात पुन्हा 'चंद्रदीप'; अतिशय चुरशीच्या लढतीत राहुल पाटलांचा अवघ्या काही मतांनी पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

SCROLL FOR NEXT