A bumper arrival of summer onions in the market committee at Pimpalgaon Baswant esakal
नाशिक

Nashik Onion News : पिंपळगाल, मालेगाव, नामपूरसह सर्वत्र आवक वाढली; निवडक कांद्याला दोन हजार ते तेवीसशेचा दर

सकाळ वृत्तसेवा

Nashik Onion News : निर्यातबंदी उठविल्यानंतर सोमवारी (ता.६) सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली असून चांगल्या प्रतिच्या पण निवडक कांद्याला दोन हजार ते बावीसशे रुपयांचा दर मिळाला. हा कांदा आवकेच्या किमान पंचवीस टक्के होता.

उर्वरित कांद्याला किमान चौदाशे तर जास्तीत जास्त अठराशे रुपयांचा भाव मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असले तरी हा भाव टिकून राहील का याविषयी कांदा उत्पादक शेतकरी अजूनही साशंक आहेत. त्यामुळे अजूनही चाळीतील चांगला कांदा बाहेर पडलेला नाही. (Nashik Onion Arrivals increased district marathi news)

मालेगाव बाजार समितीच्या मुंगसे उपबाजारात सोमवारी ३० हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. चांगल्या प्रतीच्या कांद्याला सर्वाधिक २ हजार १७१ रुपये भाव मिळाला. गेल्या तीन महिन्यात प्रथमच कांदा दोन हजारावर विकला गेला. दिवसभरात चौदाशेपेक्षा अधिक वाहनातून कांदा विक्रीसाठी आला होता. यातील फक्त १०० पेक्षा अधिक वाहनातील कांद्याला दोन हजारावर भाव मिळाला. बहुतांशी कांदा १४०० ते १५०० रुपये दरम्यान विकला गेला. सर्वोच्च प्रतीच्या कांद्याला चांगला भाव मिळत आहे.

पिंपळगावी ३५ हजार क्विंटलची आवक

पिंपळगाव बसवंत : येथील बाजार समितीत आज कांद्याच्या दरात चांगली सुधारणा झाली. सोमवारी (ता. ६) कांद्याने तब्बल २३०० रुपये प्रतिक्विंटल असा गेल्या आठ महिन्यातील उच्चांकी भाव खाल्ला. तथापि आलेल्या आवकेपैकी केवळ पंचवीस टक्केच कांद्याला हा दर मिळाला आहे. इतर कांदा हा अठराशेपर्यत विकला गेला आहे. चारच दिवसात कांद्याने हजार रुपयांचे ‘लीड’ घेतले आहे. जिल्हाभरातून येथील बाजार समितीत १७०० वाहनांमधून ३५ हजार क्विंटल कांदा विक्रीसाठी आला. (Latest Marathi News)

सहा कोटी रुपयांची उलाढाल...

बहुप्रतिक्षेनंतर पिंपळगाव बाजार समितीत निवडक कांद्याचे दर दोन हजार रुपयांच्या पुढे गेले. तब्बल ३५ हजार क्विंटल कांद्याची बंपर आवक झाली. दरवाढीमुळे रविवारी रात्रीच शेतकरी पिंपळगाव बाजार समितीत कांदा विक्रीसाठी मुक्कामाला आले होते.

सकाळच्या सत्रात २३ हजार तर दुपारच्या सत्रात १२ हजार क्विंटल कांद्याचे लिलाव झाले. किमान १५००, कमाल २३००, तर सरासरी १८०० रुपये दर मिळाला. सरासरी दर पाहता एकाच दिवसात कांदा खरेदी-विक्रीतून सहा कोटी रुपयांची उलाढाल पिंपळगाव बाजार समितीत झाली. दर वधारल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसले.

खरेदीसाठी चढाओढ

कांद्यासाठी पिंपळगाव बाजार समितीत लवकरच ५० पैसे मार्केट फी आकारली जाणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा व्यापारी पिंपळगाव बाजार समितीत कांदा खरेदीला आले. सुमारे शंभरहून अधिक व्यापाऱ्यांनी लिलावात सोमवारी भाग घेतल्याने कांदा खरेदीसाठी मोठी चढाओढ होऊन बाजारभाव उच्चांकावर पोचले.

"कांदा निर्यात खुली करावी, यासाठी केंद्र शासनाला वारंवार पत्रव्यवहार केला. दीर्घ कालावधीनंतर केंद्र शासनाने घेतलेला निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे. कांद्याची मार्केट फी ५० पैसे केल्याने व्यापाऱ्यांनी पिंपळगाव बाजार समितीत कांदा खरेदीला प्राधान्य दिले."

- दिलीप बनकर, सभापती, बाजार समिती, पिंपळगाव बसवंत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT