onion  esakal
नाशिक

Nashik Onion Export : ‘NCEL’च्या अटींमुळे निर्यात रखडली; परवानगीनंतरही कांदा उत्पादक, व्यापाऱ्यांना फटका बसणार

Onion Export : कांदा निर्यातीबंदीबाबत प्रचंड ओरड झाल्यानंतर केंद्राने कांद्याच्या तुटपुंज्या निर्यातीला परवानगी दिली आहे, मात्र ही निर्यातही एनसीइएल मार्फत केली जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Onion Export : कांदा निर्यातीबंदीबाबत प्रचंड ओरड झाल्यानंतर केंद्राने कांद्याच्या तुटपुंज्या निर्यातीला परवानगी दिली आहे, मात्र ही निर्यातही एनसीइएल मार्फत केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार एनसीइएल कांदा निर्यातीसाठी टेंडर काढणार असून फार्मर प्रोड्युसर कंपनी, छोटे व्यापारी यांच्यामार्फत निर्यात करणार आहे. (Nashik Onion Export stopped due to NCEL conditions marathi news)

मात्र एनसीइएलच्या जाचक अटींमुळे निर्यातीवर बंधने येऊन त्याचा फायदा आधीप्रमाणेच शेतकऱ्यांना होण्याची शक्यता कमीच असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. कांदा निर्यात बंदीच्या धरसोड वृत्तीमुळे देशाला परकीय चलनाला मोठ्या प्रमाणामध्ये मुकावे लागत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता ६४ हजार मे.टन निर्यातीची घोषणा केली असली तरी मात्र प्रत्यक्षात त्याचा फायदा बाजारभावावर होताना दिसत नाही.

गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये कांद्याच्या दरामध्ये ३०० ते ४०० रुपये प्रतिक्विंटलची घसरण झाली आहे, त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. कांदा निर्यातबंदी होऊन तीन महिने उलटले आहेत, या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या ६ महिन्यांत कांद्यावरील वाढत्या सरकारी हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांचे सुमारे १० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.  (latest marathi news)

शेतकऱ्यांचा वाढता रोष पाहता केंद्राने बांगलादेशला ५० हजार टन आणि युएईला १४ हजार टन कांदा निर्यातीला परवानगी दिली. त्याची अधिसूचना काढली पण त्याचा फायदा मात्र शेतकऱ्यांना मिळाला नाही. निर्यात करणाऱ्यांना २०टक्के इएमडी भरावी लागणार आहे, पुरवठा पुष्टी केल्याच्या ७ दिवसांच्या आत आवश्यकतेनुसार पुरवठा पूर्ण न केल्यास २०% सुरक्षा जप्त होईल.

फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना निर्यातीची निविदा भरताना इम्पोर्ट- एक्स्पोर्ट लायसन्स, जीएसटी प्रमाणपत्र, एफएसएसआय लायसेन्स आदी कागदपत्रांची पूर्तता केल्यावरच या प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. यामुळे छोट्या निर्यातदार आणि फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

या क्षेत्रात काही मोठे कॉर्पोरेट शिरकाव करण्याची शक्यता असल्याचे जाणकारांकडून समजते. एनसीईएल व नाफेडकडे कांदा निर्यातीला लागणाऱ्या कोणत्याही पायाभूत सुविधा नाहीत, यामुळे निर्यात कशी होणार? असा प्रश्न शेतकऱ्यांबरोबर व्यापाऱ्यांना पडलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Exclusive Interview : 'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही'; महत्त्वाचं विधान करत असं का म्हणाले एकनाथ शिंदे?

Phalodi Satta Bazar: महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?

AUS vs PAK: मालिका गमावली, पाकिस्तान संघाने कर्णधार Mohammad Rizwan विश्रांती दिली; २ ट्वेंटी-२० खेळलेल्या खेळाडूला केलं कॅप्टन

Mallikarjun Kharge : जनता माफ करणार नाही...मणिपूर हिंसाचारप्रकरणी खर्गे यांची टीका

NIOT भर्ती 2024: डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सुवर्ण संधी, परीक्षा शिवाय थेट निवड

SCROLL FOR NEXT