Onion News esakal
नाशिक

Nashik Onion News: कांद्याचे दर ‘जैसे थे’मुळे आवक घटली! भाव दोन हजारांच्या खालीच, दरवाढीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

Nashik News : मालेगाव येथील बाजार समितीच्या मुंगसे उपबाजारात आज जेमतेम ५६६ वाहनांतून साडेसात ते आठ हजार क्विंटल कांद्याची आवक होती

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : ‘कसमादे’सह जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. सर्वोच्च भाव दोन हजारांच्या खालीच आहे. सलग तीन दिवस बाजार बंद असल्याने मंगळवारी (ता. २१) आवक वाढण्याची शक्यता होती. मात्र समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आखडता हात घेतला आहे. परिणामी, बाजारातील आवक कमी होत आहे. येथील बाजार समितीच्या मुंगसे उपबाजारात आज जेमतेम ५६६ वाहनांतून साडेसात ते आठ हजार क्विंटल कांद्याची आवक होती. (Nashik Onion prices income decreased news)

केंद्र शासनाने निर्यात खुली केल्यानंतरही बाजारातील भाव वाढले नाहीत. एक-दोन दिवसांचा अपवाद वगळता बाजारभाव दोन हजारांच्या खालीच राहिला. अत्यंत कमी वाहनांतील कांद्याला दोन हजारांवर भाव मिळाला आहे. गेल्या पंधरा दिवसांत सर्वसाधारण कांदा ७०० ते एक हजार २००, तसेच बहुतांशी कांदा एक हजार २०० ते एक हजार ५०० रुपयांदरम्यान विक्री झाला.

बहुतांशी बाजार समितीतील कांद्याचे लिलाव शनिवारी व रविवारी बंद असतात. सोमवारी (ता. २०) लोकसभा निवडणूक मतदानाची सुटी होती. सलग तीन दिवस बाजार बंद असल्याने मंगळवारी आवक वाढेल, अशी अपेक्षा होती. मुंगसे उपबाजारात दोन्ही सत्रांत ५६६ वाहनांतून कांदा विक्रीसाठी आणण्यात आला होता. भाव कमीत कमी ५५०, तर जास्तीत जास्त एक हजार ९३५ रुपये होता. सर्वसाधारण बाजारभाव एक हजार ५०० ते एक हजार ६५० रुपयांच्या दरम्यान होता. (latest marathi news)

चाळीत साठवणुकीवर भर

‘कसमादे’त अजूनही शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर उन्हाळी कांदा शिल्लक आहे. शेतकऱ्यांनी चाळींमध्ये कांदा राखून ठेवला आहे. आगामी काळात भाव वाढतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. नवीन कांदा बाजारात येण्यास दिवाळी उजाडेल. दरम्यानच्या काळात वाढत्या उन्हामुळे कांदा खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सध्या मिळत असलेल्या भावामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. निर्यातबंदी खुली करूनही भाव वाढत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या नाराजीचा परिणाम लोकसभा निवडणूक प्रचार व मतदानाच्या दिवशी प्रकर्षाने दिसून आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tingre: शरद पवार ईडीला घाबरले नाहीत, तुमच्या नोटिशीला काय घाबरणार! सुप्रिया सुळेंचा टिंगरेंना टोला

DY Chandrachud: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ अखेर संपला! ‘या’ महत्वाच्या खटल्यांवर दिले निर्णय

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Vadgaon Sheri News : पोर्शे अपघात प्रकरणी टिंगरेंनी दिली शरद पवार यांना नोटीस - सुप्रिया सुळे

Sakal Natya Mahotsav 2024 : संकर्षण कऱ्हाडे यांच्या उत्तमोत्तम नाटकांची रसिकांना मेजवानी १५ ते १७ नोव्हेंबरला

SCROLL FOR NEXT