A soggy onion thrown by the roadside due to rain esakal
नाशिक

Nashik Onion Rain Crisis : कांदा 300 रुपयांची घसरला; अति पावसामुळे चाळीतील कांद्यालाही फटका

Onion Rain Crisis : तालुक्यासह कसमादेत परतीच्या पावसाने शुक्रवारी (ता. ११) एका रात्रीत मालेगाव तालुक्यातील १३ पैकी १० मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली.

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : तालुक्यासह कसमादेत परतीच्या पावसाने शुक्रवारी (ता. ११) एका रात्रीत मालेगाव तालुक्यातील १३ पैकी १० मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली. वडनेर मंडलात सर्वाधिक १५३ मिलिमीटर एवढा पाऊस झाला. सलग चार दिवस पावसाने शेतशिवारे झोडपून काढली. शेतातील पिकांबरोबरच चाळीमध्ये राखून ठेवलेला कांदाही अनेक ठिकाणी भिजला. भिजलेला कांद्याला सडल्याने शेतकऱ्यांना तो फेकावा लागला. (Onion Rain Crisis Due to heavy rains in district )

काही प्रमाणात बाजारात ओला कांदा येत असल्याने भाव ३०० ते ४०० रुपयांनी घसरले. कसमादेत यावर्षी पाऊस चांगलाच मेहरबान आहे. संपूर्ण पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला. काही ठिकाणी परतीच्या पावसाची गरज होती. सलग चार दिवस मुसळधार पाऊस झाला. यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कसमादेत शेतकऱ्यांकडे अजूनही किमान दहा टक्के उन्हाळी कांदा शिल्लक आहे. (latest marathi news)

पाऊस आणि वाऱ्याचा वेग एवढा होता की अनेक ठिकाणी चाळीमधील कांदाही भिजला. शेतकऱ्यांनी प्रतवारी करत भिजलेला कांदा फेकून दिला. उर्वरित कांदा मिळेल त्या भावात बाजारात विक्री केला जात आहे. मुसळधार पावसाचा फटका नवीन लाल कांद्याला देखील बसला आहे. खरीप व लेट खरीप कांद्याच्या उत्पादनात नुकसानीमुळे दहा टक्के घट होवू शकेल. लाल कांदा किरकोळ स्वरूपात बाजारात येत आहे. दोन दिवसापासून पावसाने उघडीप दिली.

आगामी आठवड्यात कांदा काढणीला वेग येणार असून दिवाळीच्या सुमारास लाल कांद्याची बाजारात आवक वाढू शकेल. मंगळवारी (ता. १५) येथील मुंगसे बाजारात उन्हाळी कांदा ४ हजार २५ ते ४ हजार ४५२, ॲव्हरेज सुपर ३ हजार ७७५ ते ३ हजार ९५०, गोल्टी- गोल्टी २ हजार ४०० ते ३ हजार ४००, खाद चोपडा १ हजार ५०५ ते २ हजार ७५ रुपये दरम्यान भाव होता. २९७ वाहनातून कांदा विक्रीसाठी आला होता. परतीच्या पावसामुळे झालेले नुकसान पाहता आगामी काळात देखील कांद्याचे भाव टिकून राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

SCROLL FOR NEXT