Onion Rates Fall esakal
नाशिक

Nashik Onion Rates Fall: आठवड्यात कांदा 400 ते 500 रुपयांनी घसरला! गुजरातमधून आवक होत असल्याचा परिणाम; शेतकऱ्यांमध्ये चिंता

Onion News : गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याचे दर घसरले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याचे दर घसरले आहेत. सोमवारपासून सलग चार दिवस कांदा भावात घसरण झाली. साधारणत: चारशे ते पाचशे रुपयांनी भाव कमी झाले. उन्हाळी कांदा काढणीला येत असतांनाच लाल कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. आगामी होळीचा सण व गुजरातमधून होत असलेली कांद्याची आवक यामुळेच भाव घसरल्याचे मानले जात आहे. (Nashik Onion rates fall marathi news)

२ हजार ते २ हजार शंभर रुपयांदरम्यान असलेला भाव १६०० ते १७०० रुपये दरम्यान खाली आला आहे. येथील बाजार समितीच्या मुंगसे उपबाजारात गेल्या गुरुवारी (ता. ७) कांद्याला २ हजार ११० रुपये क्विंटल भाव मिळाला होता. आठवड्यानंतर गुरुवारी (ता. १४) १ हजार ६५२ रुपये सर्वोच्च भाव मिळाला आहे.

दिवाळीच्या सुमारास बाजारभाव ४२०० ते ४३०० रुपयापर्यंत गेला होता. कांद्याला मिळत असलेला भाव पाहून शेतकऱ्यांनी खरीपाची अर्धवट पिके काढून टाकली. त्या जागी लेट खरीप कांदा लागवड केली. पावसाळी लाल, लेट खरीप कांद्याची धूम सुरु असतांनाच केंद्र शासनाने ८ डिसेंबरला निर्यातबंदी जाहीर केली. गेल्या तीन महिन्यात प्रथमच कांद्याने दोन हजाराचा टप्पा ओलांडला होता.

गेल्या गुरुवारी २ हजार ११० सर्वोच्च भाव मिळाला. अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा दोन हजाराच्या वर विकला गेल्याने शेतकऱ्यांच्या उन्हाळी कांद्याबाबत अपेक्षा उंचावल्या होत्या. तालुक्यासह कसमादेत उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे. उपलब्ध पाण्यावर शेतकरी कांद्याचे पीक जगवित आहेत. भाव कमी होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लाल कांदा प्रामुख्याने विक्रीसाठी येत आहेत.

कमी प्रतीचा कांदा ४०० रुपये

येथील बाजार समितीत लाल सुपर १५५० ते १६५२ रुपये भाव होता. ॲव्हरेज सुपर १३५० ते १५५०, ॲव्हरेज गोल्टा १२५० ते १४००, गोल्टी १००० ते ११०० दरम्यान भाव होता. बहुतांशी कांदा ११०० ते १४०० रुपये दरम्यान विकला गेला. कमी प्रतीच्या कांद्याला अवघा चारशे रुपये भाव मिळत आहे. किरकोळ बाजारात कमी प्रतिचा कांदा १५ ते २० रुपये तर सर्वसाधारण कांदा ३० रुपये किलोने विकला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT