नामपूर : केंद्र शासनाच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे येथील बाजार समितीच्या आवारात कांद्याच्या दरात सुमारे १ हजार ५०० ते १ हजार ८०० रुपयांची घसरण झाली.
ऐन दुष्काळी परिस्थितीत कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. चार दिवसांच्या प्रतिक्षेतनंतर मंगळवारी (ता.१२) पासून येथील बाजार समितीत दुपारच्या सत्रापासून कांद्याचे लिलाव सुरू झाले.
नामपूर व करंजाड उपबाजार आवारात २८२ वाहनांतून ७ हजार १०० क्विंटल कांद्याची आवक झाली. केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे कांद्याच्या दराबाबत दोलायमान स्थिती असल्याने कांदा व्यापारी खरेदीसाठी निरुत्साही असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
कांद्याचे भाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे अचानक कोसळल्याने व्यापाऱ्यांनाही कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचे बोलले जात आहे. (Nashik Onion Rates Nampur Onion rates fall by around Rs 1800)
येथील बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक मंडळ, कांदा व्यापारी असोसिएशनने शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समितीचे उपसभापती युवराज पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कांदा मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते वघेतल्याने मंगळवारी (ता.१२) पासून कांदा लिलाव सुरू झाले.
नामपूरला २८२ तर करंजाडला १०४ वाहनांमधून सुमारे सात हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. उन्हाळ कांद्याची साठवणूक अंतिम टप्प्यात असून लाल कांद्याची आवक वाढली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.