mla mp political leaders rasta roko andolan in alephata over onion 40 percent export duty pune  esakal
नाशिक

Nashik Onion: कांद्याचे लिलाव पुन्हा बंद; भाव मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक

सकाळ डिजिटल टीम

Nashik Onion Strike on rate issue

नाशिक- जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये तीन दिवसांनी कांदा लिलाव सुरु झाला होता. पण, पुन्हा एकदा शेतकऱ्यांकडून लिलाव बंद पाडण्यात आला आहे. कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने आणि नाफेडचे अधिकारीही याठिकाणी उपस्थित नसल्याने शेतकरी नाराज आहेत. त्यामुळे शेतकरी आक्रमक होत त्यांनी कांदा लिलाव बंद पाडला आहे. लासलगाव आणि पिंपळगाव येथील बाजारपेठातील कांदा लिलाव बंद पाडण्यात आलाय.

तीन दिवसांनी सुरु झालेला लिलाव आज दोन तासांतच बंद झाला. शेतकऱ्यांना कांद्याला भाव मिळण्याची अपेक्षा होती. पण, त्यांना म्हणावा तसा भाव मिळालेला नाही. नाफेडच्या दरानुसार देखील भाव मिळत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. यावेळी नाफेडचा कोणताही अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

कांद्याला २४१० रुपये क्विटंल भाव देण्यात आलाय. पण, कांद्यासाठी किलोमागे २० रुपये खर्च होत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तीन दिवस लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांनी आज मोठ्या आशेने बाजार गाठला होता. पण, त्यांच्या पदरी निराशा पडल्याची चर्चा आहे. शेतकऱ्यांना म्हणावा तसा भाव मिळाला नाही. संतप्त शेतकऱ्यांनी लासलगाव आणि पिंपळगाव येथील बाजारपेठातील कांदा लिलाव बंद पाडला आहे.

दरम्यान, नाशिकातील कांदा प्रश्न आता मिटला असं बुधवारी जाहीर करण्यात आलं होतं. मंत्री भारती पवार यांच्या मध्यस्थीनंतर कांदा व्यावसायिकांच्या संघटनने संप मागे घेतला होता. त्यामुळे तीन दिवसांनी पुन्हा एकदा कांदा लिलाव सुरु होईल अशी आशा होती. भारती पवार यांच्यासोबत कांदा व्यायसायिकांच्या संघटनेची बुधवारी बैठक झाली होती. पण, अद्याप हा प्रश्न मार्गी न लागल्याचे चिन्ह आहे.

भारतातील कांदा कुठे कुठे निर्यात होतो?

आशियाई देशांमधील अनेक पारंपरिक पदार्थांमध्ये कांद्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्यामुळे बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, मलेशिया, संयुक्त अरब अमिराती आणि श्रीलंका या देशांमध्ये भारतीय कांदा मोठ्या प्रमाणात निर्यात होतो (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: महायुतीत एकनाथ शिंदेच वरचढ! कोकणात लढवणार सर्वाधिक जागा? भाजप, राष्ट्रवादीला फक्त 'इतक्या' जागा

Haryana Election : हरियानातील हॅट्रिकनंतर भाजपचं खास सेलिब्रेशन! राहुल गांधींना पाठवली खास भेट

Latest Maharashtra News Updates : विदर्भातील 11 जिल्ह्यांना आज पावसाचा इशारा, पश्चिम महाराष्ट्रात काय स्थिती?

Share Market Opening: आरबीआयच्या निर्णयापूर्वी शेअर बाजार तेजीत; निफ्टी 25,000च्या वर, कच्च्या तेलात मोठी घसरण

Mumbai High Court: खड्डे बुजवण्यासाठी आतापर्यंत काय केले? महामुंबईतील पालिकांना न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT