On the occasion of the unveiling of the 'Udyoginimart' portal, Commissioner of Directorate of Administration Manoj Ranade, Joint Commissioner Shankar Gore, esakal
नाशिक

Nashik News : बचतगटाच्या उत्पादनांना ऑनलाइन बाजारपेठ; ‘उद्योगिनीमार्ट’ पोर्टलचे अनावरण

Nashik News : केंद्र शासन पुरस्कृत ‘दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान’ अंतर्गत राज्यातील स्वयंसहाय्यता बचतगटाच्या उत्पादनांना ऑनलाइन बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : केंद्र शासन पुरस्कृत ‘दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान’ अंतर्गत राज्यातील स्वयंसहाय्यता बचतगटाच्या उत्पादनांना ऑनलाइन बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. ही बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष, नगरपरिषद प्रशासन संचालनालय. (Online market for products of women self help groups)

नवी मुंबई व टिम फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने उद्योगिनी मार्ट पोर्टल तयार करण्यात आले. त्या पोर्टलचे अनावरण बुधवारी (ता. ३१) नगरपरिषद प्रशासन संचनालयाचे आयुक्त मनोज रानडे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे सहआयुक्त शंकर गोरे, सहआयुक्त, प्रादेशिक सहआयुक्त नितीन पवार.

जिल्हा सहआयुक्त श्याम गोसावी, पुणे विभागीय उपायुक्त दत्तात्रेय लांघी, महापालिका उपायुक्त अजित निकत, नगर महापालिकेचे उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंढे, धुळे महापालिकेच्या उपायुक्त डॉ. संगीता नांदूरकर, अकोला महापालिकेच्या उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, टिम फाउंडेशनचे व्यवस्थापक किशोर आडकर असे एकूण २५० अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

उद्योगनीमार्ट. इन (Udyoginimart.in) या संकेतस्थळामुळे राज्यातील स्वयंसहाय्यता बचत गटाच्या उत्पादनांना राष्ट्रीय व जागतिक स्तरावर ऑनलाइन बाजारपेठ आजपासून उपलब्ध झाली आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून बचतगटांनी बनविलेले गुणवत्तापूर्ण उत्पादने योग्य दरात उपलब्ध झाले आहेत. या संधीमुळे राज्यातील स्वयंसहाय्यता बचतगट आर्थिक सक्षम होऊन महिलांच्या सक्षमीकरणास मदत होणार आहे. या पोर्टलवर नागरी भागातील बचत गटांची ३०० प्रॉडक्ट ऑनलाइन करण्यात आले. (latest marathi news)

महापालिकेकडून पाच हजार महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण

महिला व बालकल्याण विभागाच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत महापालिकेकडून नव्याने पाच हजार महिलांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या मान्यता प्राप्त संस्थेकडून हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी सात कोटी रुपयांच्या खर्चाला महासभेची मान्यता घेण्यात आली.

सद्यःस्थितीत २०१७ महिला व युवतींना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षण वर्गासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त होत असल्याने प्रशिक्षणापासून लाभार्थी वंचित राहू नये यासाठी मागील त्याला स्वयंरोजगार प्रशिक्षण हे धोरण राबविण्यात आले आहे. त्याअनुषंगाने नव्याने पाच हजार लाभार्थ्यांना प्रशिक्षण योजनेचा लाभ दिला जाणार आहे. सद्यःस्थितीत असिस्टंट ब्युटी थेरपिस्ट १२३२, सेल्फ एम्प्लॉयर ट्रेनर ५६८, फॅशन डिझायनर १६७, योगा ट्रेनर ८२, मल्टी स्किल टेक्निशियन (फूड प्रोसेसिंग) २८ याप्रमाणे २०७७ महिलांना प्रशिक्षण दिले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT