YCMOU Admission esakal
नाशिक

Nashik YCMOU : ‘मुक्त’च्‍या प्रवेशासाठी पुन्‍हा मुदतवाढ; 9 ऑक्‍टोबरपर्यंत ऑनलाइन नोंदणीची संधी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शिक्षणक्रमांना प्रवेशासाठी पुन्‍हा एकदा मुदतवाढ मिळाली आहे. कृषी शिक्षणक्रम, बी.एड. (सेवांतर्गत ) व बी.एड. (विशेष) वगळता उर्वरित अभ्यासक्रमांसाठी ही मुदतवाढ लागू राहील. त्‍यानुसार ९ ऑक्‍टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरून प्रवेश घेता येईल. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. (Online registration opportunity extended till 9th ​​October for Mukta admission )

यापूर्वी दिलेली वाढीव मुदत सोमवारी (ता. ३०) संपुष्टात येत असताना, विद्यापीठाने पुन्‍हा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्‍यामुळे विद्यार्थी वाढीव कालावधीत विनाविलंब शुल्क भरून प्रवेश घेऊ शकतील, अशी माहिती विद्यापीठाच्या विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक प्रा. प्रकाश देशमुख यांनी दिली. विद्यार्थ्याने शिक्षणक्रमाबाबत विद्यापीठाच्‍या संकेतस्‍थळाला भेट द्यावी. माहितीपुस्तिका वाचल्‍यानंतर प्रवेश अर्ज भरावा. पूर्णपणे व अचूक भरलेला प्रवेश अर्ज आणि प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्रमाचे शुल्कही ऑनलाइन पद्धतीने भरावे, अशा सूचना विद्यापीठाने दिल्‍या आहेत. (latest marathi news)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: विधानसभेसाठी काय आहे भाजपचा फॉर्म्युला, जो एकनाथ शिंदे करताहेत अमान्य

Baba Siddique Murder: सिद्दीकी हत्या कटाचं काय आहे पुणे कनेक्शन, जाणून घ्या आतली बातमी एका क्लिकवर

Latest Maharashtra News Updates : शिवाजी पार्क स्मशानभूमीत अभिनेते अतुल परचुरे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

T20 World Cup 2024 : भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात; पाकिस्तानने विश्वासाला तडा दिला, आपला संघ बाहेर गेला

आजचे राशिभविष्य - 15 ऑक्टोबर 2024

SCROLL FOR NEXT