drink and drive  esakal
नाशिक

Nashik News : नाशिककर मद्यपान करून वाहनच चालवीत नाहीत! उदासीनता की कानाडोळा

नरेश हाळणोर

Nashik News : गेल्या चार महिन्यांत शहरात एकीकडे १९ पादचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झालेला असताना दुसरीकडे मात्र याच गेल्या चार महिन्यांत शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये ड्रंक ॲण्ड ड्राईव्हच्या केवळ तीन केसेसची नोंद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नाशिककर, मद्यपान करून वाहनेच चालवीत नाहीत की काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. शहर पोलिस ड्रंक ॲण्ड ड्राईव्हच्या कारवाईसंदर्भात उदासीन आहेत की याकडे सोईस्कररीत्या कानाडोळा होत आहे, याबाबत नागरिकांकडून शंका उपस्थित होत आहे. ( only three cases of drunk and driving in police commissionerate area in city )

तसेच नाशिकमध्येही पुण्याच्या ‘पोर्शे’ कार अपघाताची पुर्नरावृत्ती होण्याची भीती व्यक्त करीत आहेत. शहर हद्दीतील परिस्थिती पाहता, रात्रीच्या वेळी शहरातील रस्त्यांवरून भरधाव दुचाकी आणि चारचाकी वाहने चालविली जातात. गेल्या महिन्यातच गंगापूर रोडवर गंगापूर धरणावरून मौजमस्ती करून परतणाऱ्या युवकांच्या कारला अपघात झाला. यात तिघे जागीच गतप्राण झाल्याची गंभीर घटना घडली होती. मात्र, नाशिकमध्ये मद्यपान करून वाहने चालविली जात नाहीत, असे म्हणता येणार नाही.

परंतु तशी कारवाईही होताना दिसत नाही. गेल्या चार महिन्यांमध्ये ड्रंक ॲण्ड ड्राईव्हच्या अवघ्या तीन केसेस नोंद झाल्या आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून, यातून नाशिकमध्ये वाहनचालक मद्यपान करून वाहन चालवीतच नाहीत, असेच यातून अधोरेखित होते. परंतु शहरातील बिअरबारच्या बाहेर पार्क केलेली वाहने पाहता, पोलिसांकडून नियमित ड्रंक ॲण्ड ड्राईव्हची मोहीम राबविल्यास एकाच दिवशी शेकडो केसेस नोंद होण्याची शक्यता आहे.

गेल्या चार महिन्यात ड्रंक ॲण्ड ड्राईव्हच्या अवघ्या तीन केसेस दाखल असताना, दुसरीकडे याच काळात १९ पादचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यामुळे यातील काही अपघात हे ‘हिट ॲण्ड रन’ची असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामागे शहर पोलिसांची उदासीनता कारणीभूत असून, नियमितपणे रात्रीच्या वेळी ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची तपासणी केली तर मद्यपी वाहनचालकांना आळा बसू शकेल असे जाणकारांचे मत आहे. (latest marathi news)

चार महिन्यांत ६९ ठार

गेल्या चार महिन्यात नाशिक शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये १५६ अपघातांत ६९ जणांना प्राण गमवावा लागला. तर, १५६ जण गंभीररीत्या जखमी आहेत. गतवर्षी ४७३ अपघातांमध्ये १९४ जणांनी प्राण गमावला होता. वाहतूक शाखेकडून प्रत्येक पोलिस ठाण्यास वाहनचालकाने मद्यपान केले आहे की नाही हे तपासण्यासाठी ब्रेथ ॲनालायझर मशिन दिलेले आहे. तर वाहतूक शाखेकडे २० ब्रेथ ॲनालायझर आहेत. परंतु नियमितपणे ड्रंक ॲण्ड ड्राईव्हची मोहीम राबविली जात नाही, असा आरोप नागरिकांकडून होत आहे.

ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह कारवाई - २०२३

अपघात.... ४

गंभीर जखमी ......५

किरकोळ जखमी .......४

ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह कारवाई - २०२४

जानेवारी......०

फेब्रुवारी......२ (जखमी-४)

मार्च.....१

एप्रिल......०

एकूण ......३ (जखमी -४)

पादचारी ठार (२०२४ एप्रिल अखेर)

जानेवारी ....५

फेब्रुवारी ....६

मार्च...४

एप्रिल....४

एकूण : १९

''प्रत्येक पोलिस ठाण्यांतर्गत सायंकाळपासून रात्रीपर्यंत ठराविक वेळेला ड्रंक ॲण्ड ड्राईव्हची कारवाई केली जाते. लवकरच यासंदर्भात विशेष मोहीम राबवून कारवाई होणार आहे.''- चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त, शहर वाहतूक शाखा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT