Dangerous open DP inviting mishap at Phule Market. esakal
नाशिक

Nashik News : उघड्या इलेक्ट्रिक डीपींमुळे दुर्घटनेस निमंत्रण; शहर परिसरात दुरुस्तीसह दरवाजे बसविण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महावितरण विभागाकडून ठिकठिकाणी उच्चदाबाच्या वायरिंग असलेल्या इलेक्ट्रिक डीपी बसवण्यात आल्या आहेत. यातील बहुतांशी डीपींचे दरवाजे तुटलेले वा जागेवर नसलेले आहेत. यामुळे डीपी उघड्या पडून दुर्घटनेस निमंत्रण देत असल्याचे चित्र शहर परिसरात असून पावसाळ्यात तर त्या अधिक धोकादायक ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. पावसाळ्यात वीज पुरवठ्याशी संबंधित अनेक समस्या जाणवतात. (Nashik Open electric DP is dangerous of citizen )

विशेष करून विद्युत पुरवठा खंडित होणे, पाण्यात वीज प्रवाह उतरणे, अशा विविध घटना घडतात. उघड्या डीपी त्यात अधिक भर टाकत असल्याचे शहर परिसरातील उघड्या डीपींचे दरवाजे दुरुस्त करण्यासह जेथे अस्तित्वात नसतील तेथे नवीन दरवाजे वा डीपी लावण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. सध्या जागोजागी बसवलेल्या उच्च दाबाच्या तारांच्या डीपी उघड्या आहेत. (latest marathi news)

काहींचे दार तुटलेले आहेत. तर काहींचे दार चोरट्यांनी चोरून नेले आहेत. उच्च दाबाच्या डीपी उघड्या पडल्याने शॉर्ट सर्किट होणे, पावसाच्या पाण्याने पाण्यात विद्युत प्रवाह उतरणे, असे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. बऱ्याचवेळा मोकाट जनावरांसह नागरिकांना अशा डीपींतून उतरलेल्या विजेच्या प्रवाहाचा धक्का बसण्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे अशा धोकादायक डीपींची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

खरेतर पावसाळापूर्व कामांमध्ये उघड्या डीपींचे काम करणे आवश्यक आहे. मात्र तसे न केल्याने सर्वत्र उघड्या डीपी दुर्घटनेस निमंत्रण देत आहेत. अद्यापही पावसाळा सुरू झालेला नाही. वीज वितरण विभागाकडून दक्षता घेत अशा उघड्या डीपींची दुरुस्ती करून त्यावर झाकण बसविण्यात यावे. तारांची दुरुस्ती करावी. डीपी परिसरास संरक्षण जाळी बसवावी, अशा मागण्या नागरिकांकडून होत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : जम्मू काश्मीर राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मंजूर

SCROLL FOR NEXT