oxygen Cylinder blast in Shantiniketan Chowk area on Gangapur Road nashik news esakal
नाशिक

Nashik Oxygen Cylinder Explosion Case: टेम्‍पोचालकासह पुरवठादारावर गुन्‍हा; घर्षण झाल्‍याने घडली घटना

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गंगापूर रोडवरील शांतिनिकेतन चौक परिसरात ऑक्‍सिजन सिलिंडरचा स्‍फोट हा टाक्‍या एकमेकांना आदळल्‍यानंतर झालेल्‍या घर्षणामुळे घडल्‍याचे तपासातून समोर आले आहे.

दरम्‍यान या घटनेनंतर टेम्‍पोचालक तसेच ऑक्‍सिजन सिलिंडर पुरवठादार यांच्याविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Oxygen Cylinder Explosion Case Crime on supplier with tempo driver incident caused by friction nashik)

शांतिनिकेतन चौकात काल (ता.९) सायंकाळी झालेल्‍या ऑक्‍सिजन सिलिंडरच्‍या स्‍फोटाने परिसर हादरला होता. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे.

टेम्‍पोचालक संशयित मंगेश ढुमसे याच्यासह भारत कमर्शिअल सेंटर प्रा.लि.चे संचालक गणेश परमानंद राव (दोघे रा. मंगलवाडी, गंगापूर नाका) या दोघांवर गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीसाठी पोलिसांनी त्‍यांना ताब्‍यात घेतले आहे.

स्‍फोटाच्‍या कारणाचा शोध घेण्याची प्रक्रिया रविवारी (ता.१०) सुरु होती. अपघातग्रस्‍त टेम्पो भरधाव वेगात असताना रस्‍त्‍यावरील गतिरोधकाकडे दुर्लक्ष झाले. त्‍यातच अचानकपणे वाहनाचा ब्रेक मारल्‍याने तीन सिलिंडरपैकी एक सिलिंडर जोरात आदळून फुटले.

स्‍फोटात वाहन चालक ढुमसे यांच्‍यासह सहाय्यक विजय जगताप, मनोज गारे आणि टेम्‍पोमागे असलेल्‍या रिक्षाचालकासही दुखापत झाली होती. जखमींना गंगापूर रोडवरील श्री गुरुजी रुग्णालयात दाखल केले होते.

दरम्‍यान घटनेची माहिती मिळाल्‍यानंतर सहायक आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ, गंगापूर पोलिस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार घटनास्‍थळी दाखल झाले होते. तसेच अग्निशमन दलाने इतर सिलिंडरची तपासणी करून धोका नसल्‍याचे स्‍पष्ट केले.

याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक कमलाकर मोरे यांनी फिर्याद दिल्‍यानुसार टेम्‍पो चालकासह पुरवठादार याच्यावर गुन्‍हा दाखल केला आहे.

नुकसानाची व्‍याप्ती मोठी

ऑक्‍सिजन सिलिंडरच्‍या स्‍फोटात झालेल्‍या नुकसानाचा अंदाज रविवारी (ता.१०) समोर आला. यामध्ये अशोक जाधव यांची कार (एमएच १५ जेडी०७९५) तसेच रिक्षा (एमएच १५ एफवाय ८४४९) या वाहनांचे नुकसान झाले.

याशिवाय शांतिनिकेतन चौकातील इमारतीतील घरांचे, खिडकी व काचा फुटल्‍याने नुकसान झाले. महावितरणसह इतर वायरिंगचे देखील नुकसान झाले आहे.

वाहतूक नियमांची व्हावी अंमलबजावणी

या घटनेत जीवितहानी झालेली नसली तरी अपघातातून यंत्रणेने धडा घेण्याची गरज व्‍यक्‍त केली जाते आहे. नायट्रोजन, हायड्रोजन, ऑक्सिजन यासह घरगुती वापरासाठीचे सिलिंडर (एलपीजी), ऑक्सिजन व इतर औद्योगिक वापरातील वायूच्‍या वाहतूकसंदर्भातील नियमावली काटेकोरपणे पालन होण्याची आवश्‍यकता व्‍यक्‍त होते आहे.

यासंदर्भात तपासणी मोहिम राबविताना नियम मोडणाऱ्या वाहन, पुरवठादारांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar यांच्यावर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी विचलित...'

Latest Maharashtra News Updates : पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Sovereign Gold Bond: सरकारी योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट

Maratha Reservation: सरकारमुळेच माझ्या मुलाचा जीव गेला; आरक्षणासाठी जीव देणाऱ्या प्रतिकच्या आईचा जरांगेंसमोर टाहो

A Unique Hat trick: ऑस्ट्रेलियन फिरकीपटूची अनोखी हॅटट्रिक; ३६ वर्षांपूर्वी कर्टनी वॉल्श यांनी केली होती अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT