while giving a pamphlet of enlightenment against fraud. Dr. Thaksen Gorane, Mahendra Datrange esakal
नाशिक

Nashik News : अंधश्रध्देविरोधात पंचवटीत प्रबोधन मोहीम; भोंदूगिरी शून्यावर पोलिस - अंनिसचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : देवाधर्माच्या आणि अध्यात्माच्या नावाखाली लोकांचे होणारे फसवणूक थांबविण्यासाठी पंचवटी पोलिस आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नाशिक "भोंदूगिरी शून्यावर", ही प्रबोधन मोहीम राबविणार आहे. (Panchavati awareness campaign against superstition)

पंचवटी परिसरातील एरंडवाडी या कामकरी- कष्टकरी वस्तीत ठाण मांडून बसलेल्या नीलेश राजेंद्र थोरात या भोंदूबाबाला वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड व त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकतीच अटक करून त्याच्यावर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. या पार्श्वभूमीवर अंनिसतर्फे हा निर्णय घेण्यात आला.

पंचवटी परिसरातील लोकवस्ती, झोपडपट्टी, शाळा- महाविद्यालये अगदी आठवडे बाजारात सुद्धा महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते वैज्ञानिक दृष्टिकोन, चमत्कार सादरीकरण, बुवाबाजी म्हणजे काय, तिचे स्वरूप, तिचे प्रकार. (latest marathi news)

दुष्परिणाम आणि ते थांबवण्याचे उपाय अशा अंधश्रद्धा निर्मूलनाशी निगडित विविध विषयांवर समिती लोकप्रबोधन करणार आहे. अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य सदस्य प्रल्हाद मिस्त्री, जिल्हा बुवाबाजी विरोधी संघर्ष सचिव महेंद्र दातरंगे, कायदेशीर सल्लागार ऍड .समीर शिंदे आदींनी निवेदन दिले.

प्रत्येक पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक हे दक्षता अधिकारी असतात, असे जादूटोणाविरोधी कायद्यात नमूद आहे. त्यानुसार पंचवटी पोलिस सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा आणि भोंदूगिरीला लागू पडणारे विविध कायद्यांचे कलम याबद्दल जनजागरण करतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या काँग्रेसवरील टीकेपासून ते वर्षा उसगांवकरांनी केलेल्या मोठ्या खुलाशापर्यंत, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Nashik Crime : एमजी रोडच्या मोबाईल मार्केटमध्ये ‘ॲपल’ची बनावट ॲक्सेसरीज्‌; गुन्हे शाखेच्या युनिट एकचा छापा

Russell, Pooran, Hetmyer यांची श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून माघार; तर १७ वर्षीय खेळाडूला संघात स्थान

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT