Nashik Pandurang Bhadange during the 47th blood donation at the Government Blood Bank here. esakla
नाशिक

Blood Donation : संकटकाळी धावून जाणारा पांडूरंग! 47 वेळा रक्तदान करीत निभावले सामाजिक दायित्व

हर्षल गांगुर्डे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : अपघात, प्रसूती अन् विविध आजारांत जेव्हा जेव्हा रक्ताची गरज पडते तेव्हा रक्ताची नातीही मागे सरतात तिथे कायम मदतीसाठी धावून जाणारा एक ‘पांडुरंग’ सध्या चर्चेत आहे. एक नाही, दोन नाही तब्बल ४७ वेळा त्यांनी रक्तदान केले आहे. रक्तदानाविषयी भीती, अज्ञान असणाऱ्या समाजापुढे आज जागतिक रक्तदान दिनी त्यांचं उदाहरण आदर्शवत ठरत आहे. (Pandurang Bhadange fulfill social responsibility by donating blood 47 times)

चांदवड येथील रहिवासी असलेले पांडुरंग भडांगे वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यापासून नियमित त्यांच्या वाढदिवशी रक्तदान करतात. लहानपणापासून समाजकार्याची आवड असणाऱ्या भडांगे यांना रक्तदानाचे महत्व शालेय जीवनातच समजले. पुढे जाऊन वर्तमानपत्रात रक्ताअभावी होणाऱ्या मृत्यूंच्या बातम्यांनी देखील त्यांच्यावर प्रभाव टाकला.

शिवाय मुंबई-आग्रा महामार्गावर वसलेल्या गावातील त्यांचा जन्म असल्याने अगदी मोठमोठे अपघात, त्यात होणारे रक्तस्राव अन् वेळेत रक्तदाता न मिळाल्याने प्राण सोडणाऱ्या अनेकांना त्यांनी बघितलं होतं. यातूनच त्यांना नियमित रक्तदानाची गरज वाटली. विशेष म्हणजे पांडुरंग भडांगे यांचा रक्तगट ‘ओ निगेटिव्ह’ या दुर्मिळ प्रकारातील असून, तो इतर सर्व रक्तगटांना चालतो.

हा रक्तगट असणाऱ्या लोकांची विशेष नोंद रक्तदानावर काम करणाऱ्या संस्थांकडे ठेवली जाते. अशा अनेक संस्थांकडून पांडुरंग यांना रक्तदानासाठी नित्याने फोन, कॉल्स येतात. शिवाय मित्रपरिवार, नातेवाईक मंडळींना देखील त्यांच्या रक्तगटाविषयी आणि त्यांच्या उदार भावनेविषयी माहिती असल्याने ते संकट काळात धावून जाणारे ‘पांडुरंग’ ठरत आहे. (latest marathi news)

पांडुरंग भडांगे हे रिक्षाचालक म्हणून काम करतात. हे काम करीत असताना ते रक्तदानाविषयी शक्य होईल, तिथे जनजागृती करीत असतात. आजवर त्यांनी अनेक पीडितांना संकटकाळात मदत केली आहे. मात्र, याचा कुठलाही मोबदला त्यांनी घेतलेला नाही, हे विशेष.

"रक्तदान केल्याने आजवर मला कुठलाही त्रास झालेला नाही. निरोगी असणारा प्रत्येक जण प्राथमिक तपासणी करून रक्तदान करू शकतो. शासकीय रक्तपेढी मध्ये दरवर्षी मी वाढदिवशी रक्तदान करतो शिवाय आपत्कालीन परिस्थितीत बोलावणं येईल तिथे जाऊन रक्तदान करतो. रक्तदानाचे शारीरिक फायदे आहेच. परंतु, जेव्हा जेव्हा आपत्कालीन परिस्थितीत रक्तदान केलं तेव्हा तेव्हा आपल्यामुळे कुणाला जीवदान मिळतंय ही भावना सर्वोच्च मानसिक समाधान देऊन जाते." - पांडुरंग भडांगे, सामाजिक कार्यकर्ते, चांदवड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT