Vikas Sonavane, trupti kakulte sonavane esakal
नाशिक

Nashik News : ‘ऑटोमॅटिक वॉशरूम क्लिनिंग सिस्टीम’ला पेटंट! सटाण्याच्या सोनवणे दांपत्याच्या प्रयत्नांना यश

Nashik News : विज्ञानशिक्षक विकास शिवाजी सोनवणे सटाणा महाविद्यालयाच्या प्रा. तृप्ती काकुळते-सोनवणे या दांपत्याने तयार केलेल्या ‘ऑटोमॅटिक वॉशरूम क्लिनिंग सिस्टीम’ या संशोधनाची दखल केंद्र सरकारने घेतली.

सकाळ वृत्तसेवा

सटाणा : येथील विज्ञानशिक्षक विकास शिवाजी सोनवणे आणि सटाणा महाविद्यालयाच्या प्रा. तृप्ती काकुळते-सोनवणे या दांपत्याने तयार केलेल्या ‘ऑटोमॅटिक वॉशरूम क्लिनिंग सिस्टीम’ (स्वयंचलित स्वच्छतागृह प्रणाली) या संशोधनाची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. त्यांच्या या संशोधनास भारत सरकारच्या संशोधन कार्यालयाकडून पेटंट मिळाले आहे. (Patent for Automatic Washroom Cleaning System)

या संशोधन कार्यामुळे सार्वजनिक ठिकाणी असलेल्या स्वच्छतागृहांमधील स्वच्छता काही सेकंदात स्वयंचलित पद्धतीने होणार असून, मानवजातीस अधिक उपयुक्त ठरणार आहे. विकास सोनवणे यांनी बसस्थानकावरील स्वच्छतागृहाची असलेली दुर्दशा बघितली. स्वच्छतागृह अस्वच्छ होते. तसेच भिंतीवर ठिकठिकाणी पान, गुटखा, तंबाखू खाऊन थुंकलेले होते.

थुंकण्याचे दुष्परिणाम जगाने कोविड संकटकाळात बघितले असून, त्यामुळे संपूर्ण मानवजातीचे अपरिमित नुकसान झाले आहे. या घटनेमुळे अशा सार्वजनिक व खासगी स्वच्छतागृह व शौचालयांची स्वच्छता, तसेच चार भिंती आणि खालच्या भागाची स्वच्छता स्वयंचलित पद्धतीने कोणताही कर्मचारी नियुक्त न करता कशी होईल, यासाठी विज्ञानाच्या सहाय्याने काही प्रणाली विकसित करता येईल का, या सर्व गोष्टींचा विचार करून श्री. सोनवणे यांनी संशोधनकार्य सुरू केले.

या कार्यात त्यांच्या पत्नी प्रा. तृप्ती काकुळते-सोनवणे यांनीसुद्धा सहभाग घेतला. अनेक अडथळे पार करत अखेर त्यांनी ही प्रणाली तयार केली. त्यानंतर हे संशोधनकार्य भारत सरकारकडे पेटंट मिळविण्यासाठी सादर केले. केंद्र सरकारने या संशोधनाची दखल घेऊन तत्काळ पेटंट दिले. (latest marathi news)

विकास सोनवणे अंतापूर (ता. बागलाण) येथील जनता विद्यालयात विज्ञानशिक्षक, तर तृप्ती काकुळते-सोनवणे या येथील कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत. या संशोधन कार्यास सिन्नर महाविद्यालयाच्या प्रा. वैशाली रहाणे यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले. नवीन संशोधनास केंद्र सरकारकडून मिळालेल्या पेटंटबद्दल सोनवणे दांपत्याचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.

कशी काम करेल सिस्टीम?

सोनवणे दांपत्याने तयार केलेल्या ‘ऑटोमॅटिक वॉशरूम क्लिनिंग सिस्टीम’च्या सहाय्याने सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता स्वयंचलित पद्धतीने होईल. शौचालयांच्या स्वच्छतेसाठी कोणताही स्वच्छता कर्मचारी नियुक्त करण्याची आवश्यकता नाही. या प्रणालीत पाच व्यक्तींचा प्रोग्राम तयार केला आहे.

पाच व्यक्तींनी शौचालयाचा वापर केल्यास ही प्रणाली स्वयंचलित असल्याने अवघ्या तीस सेकंदात चार भिंती आणि खालचा पृष्ठभाग आपोआप स्वच्छ होऊन त्यानंतर पुन्हा वापरासाठी सज्ज होईल. ही प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी कमी खर्च आणि कमी ऊर्जा लागणार आहे. विद्युत आणि सौरऊर्जेवर देखील ही प्रणाली चालू शकते. त्यामुळे रेल्वेस्थानक, बसस्थानक, शॉपिंग मॉल, हॉटेल्स, थिएटरसारख्या ठिकाणी ही प्रणाली उपयोगी ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tingre: शरद पवार ईडीला घाबरले नाहीत, तुमच्या नोटिशीला काय घाबरणार! सुप्रिया सुळेंचा टिंगरेंना टोला

DY Chandrachud: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ अखेर संपला! ‘या’ महत्वाच्या खटल्यांवर दिले निर्णय

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Vadgaon Sheri News : पोर्शे अपघात प्रकरणी टिंगरेंनी दिली शरद पवार यांना नोटीस - सुप्रिया सुळे

Sakal Natya Mahotsav 2024 : संकर्षण कऱ्हाडे यांच्या उत्तमोत्तम नाटकांची रसिकांना मेजवानी १५ ते १७ नोव्हेंबरला

SCROLL FOR NEXT