Black contaminated water runoff from fertilizer plants esakal
नाशिक

Nashik Water Issue : पाथर्डीतील शेतकऱ्यांना ‘काळ्या पाण्याची’ शिक्षा; खत प्रकल्पातील पाणी शेतातील विहिरीत

Water Issue : गतवर्षी १९ ऑगस्टला खत प्रकल्पातून वाहणाऱ्या काळ्या पाण्याविरोधात पाथर्डी ग्रामस्थांनी आंदोलन केले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Water Issue : गतवर्षी १९ ऑगस्टला खत प्रकल्पातून वाहणाऱ्या काळ्या पाण्याविरोधात पाथर्डी ग्रामस्थांनी आंदोलन केले. महापालिका अधिकाऱ्यांनी त्यानंतर दोन महिन्यात येथे अडीच किमीची स्वतंत्र ड्रेनेजलाइन टाकण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी मोठी तरतूददेखील केल्याचे सांगितले. मात्र, हे आश्वासन हवेतच विरले असून यंदा पुन्हा हे काळे पाणी शेतकऱ्यांची परीक्षा बघत आहे. (Pathardi villagers protest against black water flowing from fertilizer plant )

वर्षांपूर्वी खत प्रकल्पात असलेल्या कचऱ्याच्या बेड खालून झिरपणाऱ्या या काळ्या पाण्याच्या जागी जात पाथर्डी भागातील शेतकरी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी मनपा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले होते. हे काळे पाणी पाइपद्वारे ड्रेनेज लाईनद्वारे थेट पिंपळगाव खांब येथील शुद्धीकरण केंद्रात न्यावे, अशी मागणी आहे. पावसाळा सुरू झाल्याने हे काळे पाणी पुन्हा शेतीतील विहिरीत उतरले आहे.

हे पाणी गौळाणे रस्त्यावर राहणाऱ्या पाथर्डी परिसरातील रामदास जाचक, जगन डेमसे, तानाजी जाचक, झुंबर डेमसे, राजू डेमसे, दौलत जाचक, संतू डेमसे आदी शेतकऱ्यांच्या शेतातून वाहत जात वाडीचे रान येथील वालदेवी नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याजवळ मिसळते. जनावरेदेखील या पाण्याला तोंड लावत नाहीत. पाण्याचा उग्र वास येतो. डासांची पैदास यामुळे वाढली असून विषारी किडेदेखील निर्माण झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. (latest marathi news)

तेव्हा बाळकृष्ण शिरसाट, त्र्यंबक कोंबडे, मदन डेमसे, धनंजय गवळी, खंडेराव धोंगडे, सुनील कोथमिरे, तानाजी गवळी, चंद्रभान कोंबडे, संजय जाचक, बंडू डेमसे, दत्तू डेमसे, तुकाराम जाचक, विजय डेमसे, उत्तम डेमसे, बाकेराव जाचक, किसन नवले, विष्णू डेमसे आदींनी आंदोलन केले होते. तत्कालीन मनपा अतिरिक्त आयुक्त भाग्यश्री बानाईत यांना त्या वेळी हे काळे पाणी भेट देण्यात आले होते. त्यामुळे त्याच दिवशी म्हणजे २१ ऑगस्ट २०२३ ला उदय धर्माधिकारी आणि गणेश मैंद या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष येथे भेट देऊन तातडीने याबाबत निविदा प्रक्रिया आणि सोपस्कार पार पाडून अडीच किलोमीटर लांब ड्रेनेज लाईन टाकून हे पाणी प्रवाहित केले जाईल, असे आश्वासन दिले होते.

त्यानंतरदेखील दोनच दिवसात ठाकरे पक्षाचे तत्कालीन महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली खत प्रकल्पाजवळ आंदोलन करण्यात आले होते. त्या वेळी १५० घंटागाड्या सुमारे तीन तास रोखून धरल्या होत्या. तातडीने काम सुरू करतो, असे आश्वासन दिल्यानंतर तेदेखील आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र वर्षभरानंतरदेखील हे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा ही काळ्या पाण्याची शिक्षा येथील शेतकऱ्यांच्या नशिबी आली आहे.

''दोन दिवसांपूर्वी मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्याकडे पुन्हा एकदा हा प्रश्न मांडला आहे. या भागातील शेतकरी आता कमालीचे संतप्त झाले आहेत. वेळप्रसंगी पुन्हा मोठे आंदोलन करण्याची मानसिकता झाली आहे.''- त्र्यंबक कोंबडे, ग्रामस्थ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narayan Rane: त्यांनी आता महाराष्ट्रात तोंड दाखवू नये; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

IPL 2025 Auction Live: अश्विनची १० वर्षांनंतर CSK संघात घरवापसी! तब्बल इतके कोटी मोजत घेतलं संघात

Latest Maharashtra News Updates : देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या डोक्यात येतायत आश्रमवासी होण्याचे विचार? म्हणते, "महाराष्ट्रावर प्रेम नसतं तर..."

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: ऋषभ, श्रेयस आणि व्यंकटेश अय्यर या लिलावातील महागडे खेळाडू! कॉनवेची चेन्नईत घरवापसी, तर वॉर्नर-पडिक्कल अनसोल्ड

SCROLL FOR NEXT