Pavitra Portal Teacher Recruitment esakal
नाशिक

Pavitra Portal Teacher Recruitment: प्रदिर्घकाळानंतर नांदगावला मिळाले 69 गुरुजी! पवित्र पोर्टलनिमित्त लागली लॉटरी

Nashik News : नांदगाव तालुक्यात यंदाच्या पटावरील संख्येतील मोठी घट बघता याचा परिणाम जिल्हा परिषद शाळांच्या प्रवेशावर देखील झाला होता.

सकाळ वृत्तसेवा

नांदगाव : ‘कुणी गुरुजी देता का गुरुजी’ असे म्हणण्याची वेळ आलेल्या नांदगाव तालुक्याला पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीची सर्व प्रक्रिया ऑनलाइन पार पडली. पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला प्राप्त झालेल्या शिक्षक यादीत लॉटरी लागली असून, नांदगावच्या वाट्याला ६९ प्राथमिक शिक्षक नव्याने मिळाले आहेत. (Pavitra Portal Teacher Recruitment) जिल्ह्यात सर्वाधिक रिक्त संख्या असलेल्या तालुक्याचा अनुशेष यामुळे बऱ्यापैकी भरून निघण्यास मदत होणार आहे. (nashik Pavitra Portal Teacher Recruitment Nandgaon marathi news)

नांदगाव तालुक्यात यंदाच्या पटावरील संख्येतील मोठी घट बघता याचा परिणाम जिल्हा परिषद शाळांच्या प्रवेशावर देखील झाला होता. एरवी शिक्षक मिळत नाही म्हणून पालकांकडून शाळांना कुलुप लावण्याचा शिरस्ता कायम असणाऱ्या नांदगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षणाची वर्षानुवर्षे होणारी हेळसांड कमी होण्यास यामुळे मदत होणार आहे.

‘दुधाची तहान ताकावर...’ या न्यायाने गेल्या दहा वर्षातील शिक्षकांच्या शिलकी राहणारा अनुशेष काही प्रमाणात दूर होण्यास मदत झाली आहे. आमदार सुहास कांदे यांनी आपल्या तालुक्यातील प्रशासनाच्या आस्थापनातील रिक्त पदांबाबत जिल्हास्तरीय यंत्रणेकडे पाठपुरावा केला होता.

तालुक्यातील सर्वच प्राथमिक शिक्षकांच्या संघटनांनी देखील वेळोवेळी आंदोलन छेडले होते. शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच नियतकालिक बदल्यांची प्रक्रिया पार पडताना नांदगाव तालुक्यातील रिक्त पदे भरून निघण्याऐवजी ती रिक्त राहत होती. तालुक्याच्या शिक्षण विभागातील रिक्त पदांची संख्या कमी होण्याऐवजी या रिक्त पदांचा अनुशेष वाढत जाऊन तो १३० पर्यंत जाऊन पोहचला होता.

आता ‘डोक्यावरचे ओझे खांद्यावर’ या न्यायाने नांदगावच्या वाट्याला ६९ प्राथमिक शिक्षक नव्याने मिळाले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक रिक्त संख्या असलेल्या नांदगावचा अनुशेष त्यामुळे बऱ्यापैकी भरून निघण्यास मदत झाली आहे. (Latest Marathi News)

नियुक्त शिक्षकांची स्थिती

नांदगाव तालुक्यातील प्राथमिक उप शिक्षकांची एकूण मंजूर पदे ६०३ पैकी ४७० पदे कार्यरत आहेत. १३१ पदे रिक्त आहेत. त्यात आता नव्याने ५९ शिक्षक मिळाले. पदवीधर प्राथमिक शिक्षक एकूण ३६ पदे मंजूर असून, त्यापैकी १० शिक्षक मिळाले आहेत.

रिक्त पदांची स्थिती

पदवीधर भाषा २२, समाजशास्त्र ९, मुख्याध्यापक २५ पदे रिक्त आहेत. विस्तार अधिकारी ४, तर केंद्रप्रमुखाची ७ पदे रिक्त आहेत. संवर्गातील गटशिक्षण अधिकाऱ्याचे पददेखील अद्याप रिक्त ठेवण्यात आले आहे.

"शिक्षक संघटनांनी आमदार सुहास कांदे व जिल्हा शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांच्याकडे रिक्त पदांबाबत वेळोवेळी आवाज उठविल्यानंतर आता पवित्र पोर्टलच्या निमित्ताने का होईना नांदगावचा भार कमी झाला आहे." - राजेंद्र पाटील, राज्य उपाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT