paytm sakal
नाशिक

नाशिक : शहर बससेवेच्या तिकिटासाठी पेटीएम सुविधा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या शहर बससेवेमध्ये आता तिकिटासाठी पेटीएम सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना ऑनलाइन तिकीट खरेदी करता येणार आहे. या योजनेचा शुभारंभ बुधवारी (ता.२७) महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.

महापालिकेकडून आठ जुलैपासून शहर बससेवा सुरू करण्यात आली. पाच टप्प्यात शहरात पूर्ण क्षमेतेने बस सेवा सुरू केली जाणार आहे. सध्या तीन टप्प्यात १०१ बस चालविल्या जात आहे. शैक्षणिक संस्था व धार्मिक स्थळे सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची संख्या वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेकडून टप्प्याटप्प्याने बस वाढविल्या जात आहे. प्रवाशांना सिटीलींक कंपनीकडून विविध सेवा पुरविल्या जात आहे. त्यात आता कॅशलेस सेवेची भर पडली आहे. कॅशलेस प्रवाशांना पेटीएम ॲपद्वारे प्रवासी तिकीट काढता येऊ शकणार आहे.

आयुक्त जाधव यांच्या उपस्थितीत पेटीएम सेवेचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी सिटीलिंकचे मुख्य कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके, कार्यकारी अभियंता बाजीराव माळी, महाव्यवस्थापक वसंत गायधनी, मिलिंद बंड, स्मार्टसिटी प्रोजेक्ट, पेटीएमचे प्रमुख अंकित चौधरी, क्षेत्रीय प्रमुख स्मृती रंजन, सुदिप्ता पट्टनायक, राजेश वाघ, रणजित ढाकणे, संदीप लांजेवार, यशवंत नामसानी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: “आता तुमचा सुफडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही”; निवडणूक जाहीर होताच जरांगेंचं फडणवीसांना थेट आव्हान

Election Commission Press Conference LIVE : लोकशाहीतील सर्वोच्च महोत्सवाची आज घोषणा झाली - देवेंद्र फडणवीस

Alia Bhatt : "रणबीर भट्ट आणि आलिया कपूर" ; राहाने बदलली आई-बाबांची नावं

IND vs NZ: टीम इंडियाची प्लेइंग-११ पहिल्या कसोटीसाठी कशी असणार? रोहित सांगितला प्लॅन

Maharashtra Vidhansabha Election Declared: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर! आचारसंहिता लागू, मतदान आणि निकालाची तारीख काय?

SCROLL FOR NEXT