Union Minister of State for Health Dr. while inaugurating the Arogyavardhini Center Bharti Pawar. Commissioner along with Dr. Ashok Karanjkar  esakal
नाशिक

Arogyavardhini Kendra : ‘आरोग्यवर्धिनी’ केंद्रे नाशिककरांच्या सेवेत! शहर सुदृढतेच्या दिशेने वाटचाल

Nashik News : नागरी भागात वैद्यकीय सेवा भक्कम करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या वतीने आरोग्यवर्धिनी केंद्रे स्थापन करण्यात आली आहे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नागरी भागात वैद्यकीय सेवा भक्कम करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या वतीने आरोग्यवर्धिनी केंद्रे स्थापन करण्यात आली आहे. नाशिक महापालिका हद्दीत ४७ आरोग्यवर्धिनी केंद्रांचे लोकार्पण केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते मंगळवारी (ता. १२) पंचवटी विभागात झाले. त्याचप्रमाणे ४६ केंद्रांचे ऑनलाइन पद्धतीने लोकार्पण सोहळा पार पडला. आरोग्यवर्धिनी केंद्राच्या माध्यमातून आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार असल्याचा दावा डॉ. पवार यांनी केला. (nashik Arogyavardhini center marathi news)

नागरी भागातील वैद्यकीय सेवा भक्कम करण्याच्या उद्देशाने पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून आयुष्यमान आरोग्य मंदिर अर्थात आरोग्यवर्धिनी केंद्रे उभारली जात आहे. या केंद्रांचे लोकार्पण पंचवटीतील दिंडोरी रोडवरील वडजेनगर येथे पार पडले. प्राथमिक आरोग्य केंद्रांना सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम २०२१-२२ ते २०२५-२६ या पाच वर्षाच्या कालावधीत राबविले जाणार आहे.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आयुक्त डॉ. अशोक करंजकर, अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे, उपायुक्त श्रीकांत पवार, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, अधिक्षक अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अजिता साळुंखे, डॉ. प्रशांत शेटे, डॉ. नितीन रावते, विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय देवकर आदी उपस्थित होते. (latest marathi news)

शहरात ४६ आरोग्यवर्धिनी केंद्राचा लोकार्पण डिजिटल ऑनलाइन सोहळा पार पडला. महापालिकेला पंधराव्या वित्त आयोगातून १०६ आरोग्यवर्धिनी केंद्रे (आयुष्यमान) केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यापैकी ४६ आयुष्यमान आरोग्य केंद्राचे काम पहिल्या टप्यांत पूर्ण करण्यात आले.

केंद्रात १ एमबीबीएस डॉक्टर, १ स्टाफ नर्स, १ बहुद्देशीय सेवक व १ सहाय्यक अशी नियुक्ती केली जाणार आहे. दुपारी २ ते रात्री १० या दरम्यान आरोग्यवर्धिनी केंद्रे सुरू राहतील. या माध्यमातून हायपर टेन्शन, रक्तदाब, मधुमेह आदी आजारांवर उपचार केले जाणार आहे. माता व बाल आरोग्य तपासणी या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून होईल. जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ. अजिता साळुंखे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

SCROLL FOR NEXT