Rain News esakal
नाशिक

Nashik Heavy Rain : पावसामुळे तारांबळ, वाहतुकीने कोंडला ‘श्‍वास’; उड्डाणपुलावर साचले पाणी

Heavy Rain : नवरात्रोत्सवाच्या अखेरच्या दिवशी गरबा व रास-दांडियाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना पावसाने सर्वांचीच तारांबळ उडवून दिली.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नवरात्रोत्सवाच्या अखेरच्या दिवशी गरबा व रास-दांडियाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना शुक्रवार (ता. ११)च्या पावसाने सर्वांचीच तारांबळ उडवून दिली. सकाळी जोरदार ‘बॅटिंग’ केल्यावर दिवसभर विश्रां‍ती घेतलेल्या पावसाने सायंकाळी सहाला दमदार हजेरी लावली. अवघ्या तासाभरात उड्डाणपुलावर पाणी साचले; तर मुंबई नाका, द्वारका चौक, खडकाळी सिग्नल चौकात दीड तास वाहतूक कोंडी झाली. (people trouble due to heavy rain )

सारडा सर्कलपासून द्वारका चौकापर्यंत वाहतूक कोंडी झाली. रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने त्यातून मार्ग काढताना दुचाकीस्वारांची दमछाक झाली; तर फुले-हार विक्रेत्यांचे नुकसान झाले. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला ग्रामीण भागातून झेंडू विक्रीसाठी शहरात आलेल्या विक्रेत्यांना आर्थिक फटका बसला. घेऊन आलेला माल कुठल्याही परिस्थितीत विक्री करून घरी परतण्याच्या मानसिकतेमुळे त्यांनी मिळेल त्या किमतीला झेंडू विकला.

दुपारी १०० रुपये शेकडा याप्रमाणे विकला जाणारा झेंडू अक्षरश: फेकून देण्याची वेळ विक्रेत्यांवर आली. पावसामुळे झेंडूची फुले, आपट्याची पाने अगदी कमी भावात विकावी लागली. नागरिकांनी याचा फायदा उठवत कमी किमतीला फुले व आपट्याची पाने विकत घेतल्याचे दिसून आले. रविवार कारंजा, गोदाकाठ, पेठ रोड, दिंडोरी रोड या भागात शेतकरी मोठ्या प्रमाणात फुले विक्रीसाठी बसलेले होते. (latest marathi news)

मात्र, विजांच्या कडकडाटासह पाऊस दाखल झाल्याने या विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान, ग्रामीण भागातही परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. चांडवड, देवळा, निफाड, दिंडोरी या तालुक्यांत काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्र्यंबकेश्‍वर, इगतपुरीला भातशेती अक्षरश: आडवी झाली. सकाळच्या दाट धुक्यामुळे द्राक्ष पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

गरबा, दांडिया ‘पाण्यात’

नवरात्रोत्सवात अखेरच्या दिवशी शुक्रवारी गरबा, रास-दांडिया खेळण्यासाठी युवक-युवती मोठ्या उत्साहाने तयारी करीत होते. मात्र, सायंकाळच्या सुमारास आलेल्या मुसळधार पावसामुळे त्यांचा आनंद हिरावून घेतला. रात्री बारापर्यंत ध्वनिवर्धकाला परवानगी असली, तरी पावसाचा व्यत्यय आल्याने अखेरच्या टप्प्यात नवरात्रोत्सव ‘पाण्यात’ गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT