Nashik Monsoon News  esakal
नाशिक

Nashik Monsoon News : पाऊस लांबल्‍याने नाशिककर चिंतातूर! पारा वाढून 33 अंशांवर

Nashik News : पावसाचा मनमुराद आनंद घेण्याचे दिवस असताना नाशिककरांना ऐन जूनमध्ये प्रखर सूर्यकिरणांचा सामना करावा लागत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पावसाचा मनमुराद आनंद घेण्याचे दिवस असताना नाशिककरांना ऐन जूनमध्ये प्रखर सूर्यकिरणांचा सामना करावा लागत आहे. पावसाने ओढ दिल्‍याने पाऱ्यातही वाढ झाली आहे. एकूणच पाऊस लांबल्‍याने नाशिककर चिंतातूर झाले आहेत. मेमध्ये मॉन्‍सूनपूर्व पाऊस झाल्‍याने उन्‍हाळ्यापासून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. (people worried due to prolonged rain)

परंतु बहुतांश वेळा तापमान वाढीमुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत होता. जूनला सुरवात झाल्‍यानंतर आता मॉन्‍सून सरी दिलासादायक ठरतील, अशी अपेक्षा नाशिककरांना होती. मात्र जून संपत आलेला असताना तुरळक स्वरूपातच पाऊस झाल्‍याने नागरिकांचा हिरमोड झाला.

पावसाने ओढ दिलेली असताना, दुसरीकडे दिवसभर प्रखर सूर्यकिरणांमुळे उकाड्यात भर पडत आहे. शनिवारी (ता. २२) नाशिकचे कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस नोंदविले आहे. आणखी काही दिवस पाऊस लांबल्‍यास नागरिकांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार असल्याने त्‍यांच्‍या चिंतेत आणखी भर पडणार आहे. त्‍यामुळे नाशिककांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. (latest marathi news)

दोन दिवसांत साडेचार अंशांची वाढ

पावसाचा शिरकाव झाल्‍याने दोन दिवसांपूर्वी पाऱ्यात घसरण झालेली होती. गुरुवारी (ता.२०) नाशिकचे कमाल तापमान २८.४ अंश सेल्सिअस नोंदविले होते.

मात्र त्‍यानंतर पावसाने दडी दिल्‍याने अवघ्या दोन दिवसांत पाऱ्यात तब्‍बल साडेचार अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. त्‍यामुळे शनिवारी (ता. २२) नाशिकचे कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार , GRAP-4 लागू...

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

SCROLL FOR NEXT